शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गणेशपूरचा राजा यंदा दीड दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देसामाजिक भान : उत्सवावर होणारा सर्व खर्च देणार पूरग्रस्तांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण म्हणजे गणेशपुरचा राजा. आनंदाची पर्वणी. दहा दिवस उत्साहाचे. विविध उपक्रमांचे आयोजन. मात्र यंदा सामाजिक भान जपत सन्मित्र गणेश मंडळाचे उत्सवाचा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला. त्यामुळे भंडारेकरांचा लाडका गणेशपूरचा राजा केवळ दीड दिवसांचा राहणार आहे.गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते.वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात राबविले जातात. शासनाने एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून संमित्र गणेश मंडळाचा गौरवही केला आहे. अशा या मंडळाने यंदा सामाजिक भान जोपासत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात हजोरो कुटुंब उध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी सामाजिक भान ठेवत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होतो. हा खर्च टाळून संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा मंडळाने विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे पुराच्या आघातात उध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत होणार आहे. पूरपिडितांचे अश्रू याद्वारे पुसले जाणार आहे.गणेशोत्सवात भव्य सजावट, देखावा, रोशनाई आणि आरास यांना भाटा दिला जाईल. बाप्पांची स्थापनाही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येईल. या उत्सवातून वाचणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाईल.एकीकडे हजारो बांधवांच्या डोळ्यात आश्वांचा महापूर आला असताना गणेशोत्सवावर पैशाचा अपव्यय करणे उचित ठरणार नाही. त्यासाठी या मंडळाने सामाजिक भान जोपासत पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. मंडळाला दरवर्षी सढळहस्ते मदत करणाऱ्या नागरिकांनी यावर्षीही पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी. देणगीतून गोळा झालेला संपूर्ण निधी पूरग्रस्तांना पाठविला जाणार आहे.मिरवणुकीतून मदत संकलनगणेशोत्सवात सजावट, देखावे, रोशनाई आणि आरास न करता २ सप्टेंबर रोजी गणेशपूरच्या राजाची स्थापना केली जाईल. त्यादिवशी आरती, भजन, पूजन करून ३ सप्टेंबर रोजी बाप्पाची मिरणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत डिजे आणि बँडला फाटा देण्यात आला आहे. डफडी आणि शहनाई या परंपरागत वाद्याचा सहभाग राहील. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून जाईल. त्यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत केला जाणार आहे. या कार्याला भंडारेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाने केले आहे.मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून राबविले आहे. यंदा कोल्हापूर, सांगली महापूर आला. त्या पूरग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.-विनोद भुरे, अध्यक्ष सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर भंडारा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019