शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खरबीचा अल्पभूधारक शेतकरी बनला उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : पनीरची विक्रमी विक्री, कोरोना संकाटकाळात अन्य व्यवसायिकांना दिली प्रेरणा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू होताच दुध संकलन बंद झाले. मात्र अशा संकटातून आशेचा किरण शोधत भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथील शेतकरी धनराज आकरे याने कुटुंबियाच्या मदतीने पनीर तयार करुन सोशल मीडियाच्या आधाराने पनीरची विक्रमी विक्री केली.धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. लॉकडाऊनपुर्वी आकरे आपल्या गावातील दुध डेअरीत दुध घालायचे. मात्र कोरोना प्रादूर्भाव वाढताच दुध खरेदी बंद झाली. दररोज निघणारे २५ लिटर दुधाचे काय करायचे असा प्रश्न त्यांना सतावू लागला. सुरुवातीला चार दिवस गावातच नातेवाईक तसेच मित्र मंडळीना नि:शुल्क दुधाचे वितरण केले. कोरोनाच्या धास्तीने दुधाचे घरोघरी वाटप बंद झाले. पत्नी शामकला यांच्या कल्पनेतून जर आपण पनीर करुन विक्री केली तर यातूनच त्यांनी मुलगा रोहित, मुलगी हिमांशी, आई-वडील यांच्या मदतीने पनीर बनवायला सुरुवात केली. पहिले तीन दिवस पनीर घेण्यासाठी कुणी तयार होत नव्हते. मात्र काही मित्रांनी कोरोनाबाबत घेतलेल्या दक्षतेची हमी दिल्यावर पनीर खरेदी केले. त्यानंतर शेतकरी सेवार्थ दुध तसेच गावातील इतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहिती टाकताच हळूहळू आॅर्डर येवू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. यातूनच निघणाऱ्या २५ लिटर दुधाचे पनीर तयार करुन परिसरातील गावात विक्री करण्याचे ठरविले. अल्पवधीतच पनीरसाठी आॅर्डर येवू लागले. यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पनीर खरेदीविषयी आवाहन केले. शिथिलतेमुळे ग्राहक विक्री योजनेतून भाजीपाला विकण्यासही सुरुवात केली. पनीर विक्रीतून दीड महिन्याचे ५० हजाराचे नुकसान तर टळेलच याशिवाय अपेक्षीत नफाही मिळाला.अचानक दुध विक्री बंद झाल्याने पनीर निर्मितीचा निर्णय घेतला. अल्पावधित याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.-धनराज आकरे, दुध उत्पादक शेतकरी, खरबीलॉकडाऊनमुळे सगळेच जग बदलून गेले आहेत. शेतकºयांनी गटाच्या माध्यमातून व्यवसाय करीत थेट विक्री केल्यास भविष्यात खूप चांगले दिवस येतील.-रेणुका दराडे, कृषी सहायक परसोडी

टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय