शेख यांचे प्रतिपादन : सिहोऱ्यात संस्काराचे मोती स्पर्धांचे बक्षीस वितरणचुल्हाड (सिहोरा) : लोकमत विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता व सुप्त गुणांना उजाडा देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत असून जनसामान्यांचे न्यायासाठी लठा उभारत आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करित असतांना विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारे उपक्रम स्पर्धा परीक्षांची खऱ्या अर्थाने गुरुकिल्लीच असल्याचे प्रतिपादन असद शेख यांनी केले.संजय गांधी पूर्व माध्यमिक शाळा सिहोरा येथे आयोजित लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक असद शेख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद धनेंद्र तुरकर, प्रेरणा तुरकर, प्रतिक्षा कटरे, हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, बंडू बनकर, जि.एम. ठाकरे, उमेश कटरे, आर. एस. पारधी, उमेश तुरकर, एस. एस. गायधने, रंजीत चिचखेडे, एन. टी. शरणागत, पंकज शुक्ला, पी. एन. राऊत, छोटु ठाकरे, एस. आर. कामथे, एस. डी. शरणागत, रजनी हेडावू, प्रतिमा भोरजार, आरती पाठक, वैशाली वघारे, एस.के. पारधी, शिशुपाल वानखेडे, घनशाम निखारे, एन. बी. राऊत उपस्थित होते.लोकमततर्फे आयोजित संस्काराचे मोती स्पर्धा परीक्षेला सिहोरा परिसरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आदित्य तितीरमारे, अभिषेक शामकुंवर, कनक गोटेफोडे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना हेलीकॉप्टर, वॉलकार व टिफिन बॉक्स तथा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिवाय उत्तेजनार्थ १० बक्षीसे देण्यात आली तर जनरल ड्रा स्पर्धेत आदित्य रवींद्र गडरिये या विद्यार्थ्यांने बक्षीस पटकाविला आहे.स्पर्धेत सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक असद शेख यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले. आयोजित कार्यक्रमात अतिथींनी लोकमततर्फे सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमावर प्रकाश घातला. कार्यक्रमाचे संचालन व आभार एस. आर. कामथे यानी केले. (वार्ताहर)
लोकमत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली
By admin | Updated: January 25, 2016 00:43 IST