शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळाचे आरोग्य ठणठणीत ठेवा; वेळीच मोफत लसीकरण करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:46 IST

आरोग्य विभागाचे आवाहन: योग्य संगोपनासाठी वेळीच करावे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बालमृत्यू कमी करण्याचा तसेच बाळांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. हा एक अत्यंत सोपा असा मार्ग आहे. लसीकरणामुळे रोग तर होत नाही, शिवाय बाळाला रोगजंतूंशी लढण्याची ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे बाळांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेळेत लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणामुळे बाळाच्या आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जाऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून बाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ यावरील रोगप्रतिबंधक लस दिल्याने हे टाळता येते.

कोणत्या वयात कोणती लसबाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्ळ्या लसी दिल्या जातात. बीसीजी, त्रिगुणी, पोलिओ, गोवर, टायफॉइड, हिपॅटायटिस बी, हिपॅ- टायटिस ए, कांजण्या, धनुर्वात, न्यूमोनिया, संयुक्त लसी असे लसींचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते वेळापत्रकानुसार बाळाला दिले जातात.

बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यकलसीमुळे रोग निर्माण करणारे जिवाणू कमकुवत किंवा निष्क्रीय होतात. शरीरातल्या इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारकशक्तीवर हल्ला करणाऱ्या विषाणूला ओळखण्यासाठी लस मदत करते. बाहेरून होणाऱ्या हल्ल्याला रोखण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करत असते. बाळ जन्माला आलं की सर्वाधिक काळजी ही त्याच्या आरोग्याची घ्यावी लागते. बाळाला लसीकरण करण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत लस उपलब्ध करून दिली आहे.

आजारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचेदेवीसारख्या रोगाचा फैलाव कमी करण्यात लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिओ या आजारापासूनही लसीकरणामुळे संरक्षण मिळते. काही लसींमुळे शरीरात निर्माण होणारी रोगप्रति- कारशक्ती काही काळानंतर कमी होते. त्यामुळे ठराविक अंतराने त्या लसी पुन्हा दिल्या जातात.

लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका कमीप्रसुतीपूर्व काळात मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशनमुळे होणारा हिपॅटा- यटीस बी विषाणू (एचबीव्ही) संसर्ग हा देशात एक चिंतेचा विषय ठरत आहे. वेळोवेळी तपासणी करून या गंभीर समस्येला प्रतिबंध करता येतो. हिपॅटायटीस बी लसीकरण करणे आवश्यक आहे.

अर्भकाला एचबीव्ही लसीचे ३ ते ४ डोस मिळावे. ज्याचा पहिला डोस शक्यतो जन्माच्या २४ तासांच्या आत दिला जातो. एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांसाठी गर्भधारणेदरम्यान व्यवस्थापन, एचबीव्ही डीएनए व्हायरल लोड चाचणी आणि एचबीव्ही संसर्गाबाबत समुपदेशन आणि वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक आहे.- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा