जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, नितीन सदगीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, तहसीलदार अक्षय पोयाम, साहेबराव राठोड यावेळी उपस्थित होते.
सामान्य रुग्णालयातील प्राणवायू प्रकल्प, पेडियाट्रिक वार्ड, कोविड वार्ड, आयसीयू वार्ड, आरटीपीसीआर चाचणी केंद्र आदी ठिकाणी भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली होती. सनफ्लॅग कंपनी मधील ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे तिसऱ्या संभाव्य लाटेची पूर्वतयारी म्हणून सनफ्लॅग कंपनी जवळ ५०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या.
बॉक्स
कोरोनामुक्त गाव करण्यावर भर द्या
कोरोनामुक्त गाव करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून लवंगारे म्हणाल्या की, कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होतील असे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करणे आवश्यक असून सर्व खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलावीत. क्रियाशील रुग्ण नाहीत तसेच शून्य रुग्ण असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
रूट मार्चचे कौतुक
कोरोनाची 'ब्रेक द चेन' करण्यासाठी शासनाने काही निर्बंध शिथिल केले असता बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने भंडारा शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 'रूट मार्च' द्वारे जनजागृती केली. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले. लोकांमध्ये जागृती झाली. त्याचाच परिणाम म्हणून आज जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्रयोगाची आयुक्त लवंगारे यांनी प्रसंशा केली. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचे कौतुक केले.