शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

विकास साधताना पर्यावरणाचा समतोल ठेवा

By admin | Updated: March 8, 2015 00:27 IST

तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे ...

पवनी : तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे भविष्यात मानव पृथ्वीतलावरुन विलुप्त होईल, असा संशय डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. पवनी येथे आयोजित राज्यस्तरीय मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मानवाने निसर्गावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यावा व पर्यावरणाचा मातेसमान सन्मान करावा असे आवाहन ही केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत विज्ञान महाविद्यालय पवनी येथे मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर बुधवारला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. अरुणकुमार शेळके, डॉ. सतिश वटे, डॉ. के.सी. देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होतीे.तीन सत्रामध्ये आयोजित चर्चासत्राच्या पहिला सत्रामध्ये निरी नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल यांनी मानवी कृतीचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम आणि श्वावत विकास या विषयावर परिणामकारक पद्घतीने आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात नोयडा (उ.प्र.) येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.आर. चौधरी यांनी वायुप्रदूषणाची सद्यस्थिती आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या विषयावर साध्या व सोप्या भाषेत परिणामकारक आपले विचार मांडले. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात जागतिक बँकेचे सल्लागार आणि पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी मानवी उत्सर्जनाचा कृषी वर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान दिले.समारोपीय कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे आणि प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. या चर्चासत्राला राज्यातील विविध विद्यापीठातील सुमारे २०० संशोधक प्राध्यापक आणि महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मागील दोन महिन्यापासुन प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे, डॉ.जी.ए.अवचार यांचा मार्गदर्शनाखाली प्रा. विजय लेपसे संयोजक, प्रा. ए.के. अणे, सहसंयोजक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होते. (तालुका प्रतिनिधी)