शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

‘आभासी’ प्रेमाच्या जाळ्यात कोवळी तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:43 IST

स्मार्टफोनवर २४ तास आॅनलाईन असलेली कोवळी तरुणाई अलिकडे आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकली आहे. मिसरूड न फुटलेले तरुण आणि शालेय विद्यार्थिनींचे प्रेम प्रकरण अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी शाळा - महाविद्यालयच नव्हे तर ग्रामीण भागातही अशा प्रेमवीरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठळक मुद्देपालकांनो सावधान! : स्मार्टफोनवर २४ तास आॅनलाईन, मुलीचे अपहरण आणि पळवून नेल्याच्या तक्रारीत वाढ

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्मार्टफोनवर २४ तास आॅनलाईन असलेली कोवळी तरुणाई अलिकडे आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकली आहे. मिसरूड न फुटलेले तरुण आणि शालेय विद्यार्थिनींचे प्रेम प्रकरण अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी शाळा - महाविद्यालयच नव्हे तर ग्रामीण भागातही अशा प्रेमवीरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला भंडारा जिल्हाही अपवाद नाही. दररोज कुठे ना कुठे कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल होत आहे. तर निर्जनस्थळी ‘एकांतवास’ शोधणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे पालकांचीच नव्हे तर पोलिसांचीही चिंता वाढली आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तरुण पिढी सराईतपणे करीत आहे. स्मार्टफोन मधील विविध अ‍ॅप्समुळे सोईसुविधा निर्माण झाल्या. मात्र आता हा स्मार्ट मोबाईलच पालकांची चिंता वाढवित आहे. मुलगा दहावी बारावीत गेला की त्याला अ‍ॅन्ड्राईड मोबाईलच हवा असतो. पालकांची विनवणी करून तो ऐनकेन प्रकारे मोबाईल मिळवतो. स्वस्त नेट पॅकच्या माध्यमातून तो २४ तास आॅनलाईन असतो. याच आॅनलाईनने तो कधी कुणाच्या तरी प्रेमात अडकतो.भंडारा शहर तसे ग्रामीण वळणाचे. परंतु अलिकडच्या काळात पोलीस ठाण्यात पळून जाण्याच्या आणि प्रेम प्रकरणाच्या नोंदीवरून महानगरालाही मागे टाकेल अशी आकडेवारी दिसून येते. शहरातील शाळा-महाविद्यालयात झालेल्या ओळखीचे रुपांतर मोबाईलच्या माध्यमातून कधी प्रेमात होईल हे सांगता येत नाही. प्रपोज करणे आणि ब्रेकींगसारखे शब्दही आता भंडारातील तरुणाईला नवीन राहिले नाही. विशिष्ट वयात केलेल्या प्रेमाला घरचेही विरोध करणार नाही, परंतु किशोरवयात मुले प्रेमात पडत असल्याचे पाहून पालकही धास्तावल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरण झालेल्या घटनांच्या नोंदी दररोज होत आहेत. यातील आरोपी तरुण हा साधारणत: २० ते २२ वर्षाचा आणि तरुणी १५ ते १८ वर्षाची दिसून येते. अनेकदा मुलेच नाही तर मुलीही यात पुढाकार घेताना दिसून येते. पवनी तालुक्यातील एक तरुणी शुल्क भरण्यासाठी वसतिगृहात गेली. ती घरीच आली नाही. दोन दिवसानंतर तिच्या आईला फोन आला, ‘मी ज्याच्यासोबत आहे सुखात आहे. माझी काळजी करू नका’ असे सांगून फोन कट केला. अशा अनेक घटनांच्या नोंदी पोलीस ठाण्यात होत आहेत. बहुतांश प्रकरणात मुलगी ही अल्पवयीन असल्याचे दिसते. त्यामुळे तिच्या प्रियकारावर अपहरणा गुन्हा नोंदविला जातो, अनेकदा कारागृृहाची हवाही खावी लागते. दररोज असे प्रकार घडत असताना या मुला-मुलींचे समुपदेशन होताना दिसत नाही.काही प्रकरणात मुलगा आणि मुलीचे आईवडील सामंजस्याने प्रकरण मिटविण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. परंतु त्या ठिकाणी प्रेमवीर कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. विशेष म्हणजे मुलगा काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय, याचाही विचार केला जात नाही. केवळ आभासी दुनियेत वावरणारी ही तरुणाई आज प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपले करिअर आणि भविष्य उध्वस्त करीत आहेत. यासाठी पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. मुलाकडे अथवा मुलीकडे असलेल्या स्मार्टफोनची आठवड्यातून एकदा तरी तपासणी करणे गरजेचे आहे. सोशल मिडीयावरून ती-तो कुणाला संदेश पाठवते, ती-तो कोणाशी जास्त जवळीक साधते याचा वेध घेणे गरजेचे आहे. वेळीच त्यांना आवर घातली नाही तर पुढे पालकांवर पश्चातापाची वेळ येऊ शकते.काहीही झाले तरी तो माझाच.... त्याच्या आयुष्याची काठी होणार‘आम्ही एकमेकावर जीवापाड प्रेम करतो. काहीही झाले तरी तो माझाच आहे. घरच्यांनी विरोध केला तर मी जीव देईल. त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही’, असे सुशिक्षित कुटुंबातील एक तरुणी पोलिसांच्या समुपदेशनात सांगत होती. घरच्यांनी तिच्यापुढे हात टेकल्याने तिला समजवून सांगण्यासाठी भंडारा पोलिसांची मदत घेतली होती. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचा प्रियकर एका पायाने अधू आहे. घरची परिस्थितीही बेताचीच आहे. अशा परिस्थितीतही ती त्याच्याशीच लग्न करण्यासाठी का अडून बसली, तिचे असे कोणते प्रेम आहे असा प्रश्नही पोलिसांना पडला. पोलिसांनी तिला एकटीला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा जे पुढे आले ते ऐकून पोलीसच नाही तर तिचे आईवडीलही थक्क झाले. या दोघांचे प्रेम झाल्यानंतर एका दुचाकीने दोघेही फिरायला गेले होते. जातानाच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात तरुणीला दुखापत झाली नाही, परंतु प्रियकराचा पाय कायमचा अधू झाला. आपल्यामुळेच त्याला अपंगत्व आले आणि आता त्याच्या आयुष्याची काठी होऊन आपल्याला जगायचे आहे असे ती तरुणी सांगत होती.टोकाचा विरोध जीवावरही बेतू शकतोदोन दिवसांपूर्वी भंडारा शहरातील वैनगंगा नदीपात्रात तरुण तरुणीचे मृतदेह आढळले होते. नात्याने मावसबहीण भाऊ असलेल्या या दोघांनी एकमेकाला ओढणीने बांधून आत्महत्या केली. त्यावरून या दोघांनी प्रेमप्रकरणातूनच आत्महत्या केली असावी असा संशय आहे. अनेकदा घरच्यांनी विरोध केला की एकतर घरून पळून जातात किंवा टोकाचा मार्ग स्वीकारून आत्महत्या करतात. असा प्रसंग कुणावरही येऊ नये यासाठी सर्वांनीच जागरूक असणे गरजेचे आहे.जन्मदाते मोठे की प्रियकर ?जन्मापासून लाडाकौतूकात वाढविलेला घरातील मुलगा अथवा मुलगी जेव्हा प्रेमात आकंठ बुडते आणि घरच्यांचा विचार न करता महिना दोन महिन्याची ओळख असलेल्यासोबत निघून जाते तेव्हा आईवडीलांची काय स्थिती होत असेल याचा विचार प्रेमात बुडालेले करीत नाही. लहानाचे मोठे करताना आईवडीलांनी काय यातना भोगल्या असतील, आपल्यापासून आईवडीलांना काय अपेक्षा आहेत याचाही विचार प्रेमात बुडालेले करीत नाहीत. क्षणीक मोहाला आणि आभासी जगाला भुलून जन्मदात्यांपेक्षाही काही क्षण प्रियकरच मोठा वाटतो. मात्र लवकरच व्यवहारी जगात चटके बसायला लागते तेव्हा प्रेमाची नशा उतरते आणि आठवतात ते फक्त आईवडीलांचे शब्द.