शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रोशनच्या खुनाचा उलगडा, सख्खी मोठी बहीण व लहान जावईच निघाले मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 18:07 IST

रोशन बुधवारी सायंकाळी ४ वाजता घरुन निघाला मात्र, परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात आढळून आला होता.

ठळक मुद्देकांद्री येथील तरुणाच्या खुनाचे प्रकरण सख्या बहिणीने जावयाच्या मदतीने काढला भावाचा काटाचार तासांत आरोपी जेरबंद

भंडारा : सख्खी मोठी बहीण व लहान जावयाने मित्राच्या मदतीने कांद्री येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे पुढे आले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना जेरबंद केले असून, पोलिसांपुढे त्यांनी खुनाची कबुली दिली.

मोठी बहीण मनीषा ईश्वर चुधरे (३०), रा. कांद्री, लहान जावई हितेंद्र रतिराम देशमुख (२९) आणि प्रेम उमाचरण सूर्यवंशी (२२), रा. जांब, ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. रोशन रामू खोडके (२८), रा. कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात मृतदेह आढळून आला होता.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. रोशनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, खून कोणी केला हे मात्र पुढे येत नव्हते. ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी या प्रकरणाचा तपास करून अवघ्या चार तासांत रोशनची मोठी बहीण, लहान जावई आणि जावयाचा मित्र या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तिघांनी खून केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीने नेऊन दारू पाजून केला खून

रोशन हा मद्याच्या आहारी गेला होता. तो नेहमी मोठ्या बहीण व जावयाला त्रास देत होता. शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे मनीषा व तिचा पती ईश्वर नेहमी संतापलेले असायचे. यातूनच मनीषाने आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे ठरविले. लहान जावई व त्याच्या मित्राच्या मदतीने खून करण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्याला दुचाकीवरून पांजरा शेतशिवारात नेले. तेथे त्याला दारू पाजून गळा दाबला. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. त्यात तो ठार झाल्यानंतर त्याला तलावात फेकले, अशी कबुली दिली.

रोशन बहिणीकडेच झाला लहानाचा मोठा

रोशन खोडके याचे आई-वडील लहानपणीच मरण पावले. त्यामुळे त्याला मोठी बहीण मनीषा चुधरे आपल्या घरी घेऊन आली. अगदी लहानपणापासून तो मनीषाकडे राहत होता. मोलमजुरी करायचा. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले आणि या दारूनेच त्याचा घात केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू