शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्च्यात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:04 IST

भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम यांचे आवाहन : साकोलीत परिवर्तन यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. देशात लोकशाही आणायची असेल व बहुजनांना न्याय पाहिजे असेल तर सर्व जाती समुहांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्च्याच्या सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.होमगार्ड परेड ग्राऊंड येथे आयोजित परिवर्तन यात्राप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होतेकार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संघटक ओबीसी महासंघाचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे धर्मराज भलावी, भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, राष्टÑीय मुस्लीम मोर्चा तालुकाध्यक्ष फिरोज खान, व्ही. जे. एन.टी. अधिकार बचाव संघर्ष समितीचे, कार्तिक वडसकर, बुध्दिस्ट फेडरेशनचे केदार नाकाडे आदी उपस्थित होते.राष्टÑीय संयोजक वामन मेश्राम म्हणाले की, देशातील सहा हजार जातींना जागे करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेस नागनाथ तर बी.जे.पी. सापनाथ आहे. नागनाथने दंश केला तर माणुस ताबडतोब मरतो तर, सापानाथने दंश केला तर माणुस एक तासात मरतो, हे दोन्ही पक्ष हीच भूमिका बजावितात. हे दोन्ही पक्ष बहुजनांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व जातींना जोडण्याचा काम सुरु आहे. २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या विरोधात आलेला निर्णय हा संविधानच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाणारा आहे. सर्व बहुजनांवर अन्याय सुरुच आहे. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे बहुजन विरोधी नितीच्या विरोधात बहुजन क्रांतीमोर्चा यात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात ही रॅली जाणार असून या रॅलीची सुरुवात २४ एप्रिलला दिक्षाभूमी नागपूर येथून झाली. त्याचा समारोप ३ जुनला पूणे येथे समारोपीय अभिवादन महारॅली घेणार आहे.संचालन व प्रास्ताविक स्वप्नील वासनिक यांनी केले. त्आभार विवेकानंद राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वप्नील गजभिये, शुभम कुकडे, हरि येरणे, रुपेश खानोरकर व सर्व बहुजन क्रांती मोर्च्याची संयोजन समिती यांनी केले. भर उन्हात दुपारी २ वाजतापर्यंत सभा चालली. सभेला शेकडोंची गर्दी झाली होती. भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली