भंडारा : जोहल कॅरिअर्स केसलवाडा (वाघ) या कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे, असा आरोप करुन या कारखान्यात कार्यकत कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. गरीब कामगारांना काम न देता स्वत:च्या नातेवाईकांना काम देऊन अन्य कामगारांवर अन्याय करीत असल्याचे कामगारांचे म्हणने आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील सर्व लोकांना रोजगार प्राप्त व्हावा त्याकरिता शासन विविध उपाययोजना राबवितो. त्यामध्ये विविध सोयीसुविधा कामगारांना मिळतात की नाही याची खबरदारी करून देणे, उद्योगांना सबसिडी शासनातर्फे देण्यात येतात. त्याचप्रमाणे अशोक लेलँड कंपनीला शासनामार्फत विविध उपाययोजना पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे अशोक लेलँड कंपनी सुध्दा आपल्या कंत्राट कंपनीला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देतो. परंतु अशोक लेलँड वंष्ठपनीची जोहल कॅरिअर्स या कंपनीचे शाखा व्यवस्थापक मागील काही दिवसांपासून ३० ते ४० कामगार ड्रायव्हरांना काम न देता आपल्या मर्जीतील व नातेवाईकांना काम देऊन कामगार ड्रायव्हरांना आर्थिक तसेच मानसिक त्रास देण्याचे काम शाखा व्यवस्थापक करीत आहे. काही दिवसांआधी कामगारांनी शाखा व्यवस्थापकाला विचारणा केली. पण शाखा व्यवस्थापकाने उडवेगिरीचे उत्तर दिले. तसेच कामगारांच्या विविध मागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे अध्यक्ष विशाल भोयर यांच्या नेतृत्वात मागणी केली. पण शाखा व्यवस्थापक बहिरे यांनी उलट कामगारांना व विशाल भोयर यांना खोट्या आरोपात फसविण्याची धमकी दिली. म्हणूनच कामगारांच्या विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष इंजि. विशाल भोयर यांच्या नेतृत्वात कामगार ड्रायव्हर ह्या सर्व लोकांनी जोहल कॅरिअर्स आमरण उपोषण चालू केले आहे. आमरण उपोषण करणाठयामध्ये इंजि. विशाल भोयर, सुभाष टिचकुले, नाना शेंडे, संतोष सावरकर, केशव लुटे, बंसी भोयर, अरुण पेंदाम, जयपाल खराबे आदी उपस्थित आहेत. (शहर प्रतिनिधी)
जोहल कंपनीच्या वाहनचालकाचे उपोषण
By admin | Updated: January 10, 2015 00:58 IST