शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

जयश्री व ज्योतीला मिळाला मायेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:15 IST

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर उदंड आयुष्य साथ कोण देणार, असा यक्ष प्रश्न उभा असताना ऊमद्या तरूणांनी धीर देत

उमद्या तरूणांचाही पुढाकार : सरपंच, तंमुसही सरसावलेइंद्रपाल कटकवार   भंडाराआई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर उदंड आयुष्य साथ कोण देणार, असा यक्ष प्रश्न उभा असताना ऊमद्या तरूणांनी धीर देत 'त्या' अनाथ मुलींच्या जीवनात चैतन्य फुलविण्याचा विडा उचलला आहे. परिणामी जयश्री व ज्योतीला मायेचा आधार मिळाला आहे. याला सरपंच व तंटामुक्त समितीसह ग्रामस्थांनीही हातभार लावला आहे. भंडारा तालुक्यातील पिंडकेपार (टोला) येथे शंकर दलपत चांदेकर या मृत पावलेल्या इसमाच्या कुटूंबियात आता फक्त त्याची दोन मुली जीवनाच्या संघर्षात एकट्या आहेत. मंगळवार (१० जानेवारी) दिवशी जयश्री व ज्योतीची आई हृदयविकाराने मरण पावली. बाबा नसताना भगवंताने आईचाही आधार हिरावून घेतला. या अनाथ मुलींचा आधारवड हिरावल्याने त्यांचा सांभाळ करणारे देवदूत त्यांना मिळतील काय, या आशयाचे वृत्त लोकमतने गुरूवारी (१२ जानेवारी) प्रकाशित केले. मानवी संवेदना हरविली असताना दोन ऊमद्या तरूणांनी या दोन्ही बालिकांच्या जीवनात पुन्हा एकदा आशावाद निर्माण केला. जयश्री (१३) व ज्योती (८) या दोघींना आगामी शैक्षणिक सत्रात वसतीगृहात दाखल करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात होणाऱ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च हे दोघे उमदे तरूण उचलणार आहेत. भाजपचे नगरसेवक आशिष गोंडाने तथा भाजपचे व्यापारी आघाडी सेलचे अध्यक्ष नितीन दुरगकर अशी या तरूणांची नावे आहेत. मदतीचा हातपिंडकेपार सरपंच प्रशांत रामटेके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबलू आतिलकर यांनी चांदेकर यांच्या घरी भेट देवून आर्थिक मदत दिली. यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्य वर्षा साकुरे यांनीही या मुलींना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच सुषमा मडामे, ग्रामपंचायत सदस्य संजय साठवणे, वनमाला दिवटे, पोलीस पाटील साठवणेश्रीकांत मेश्राम, प्रल्हाद मेश्राम, सुरेश मेश्राम आदी उपस्थित होते.