शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

ऐतिहासिक पोळ्यात उसळला जनसागर

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

परसोडी (जवाहरनगर) येथे १८४८ पासून परसोडी या ठिकाणी ऐतिहासिक पोळा भरतो.

१५७ वर्षांची परंपरा : दीडशे बैलजोड्यांची हजेरीजवाहरनगर : परसोडी (जवाहरनगर) येथे १८४८ पासून परसोडी या ठिकाणी ऐतिहासिक पोळा भरतो. या ही वर्षी विक्रमी बैलांच्या जोडींनी उच्चांक गाठला. उत्कृष्ट बैलजोडी सजावटीकरिता पुरस्कार देण्यात आले.परसोडीवासीयांनी जपलेली १५७ भूषणावह वर्षाची परंपरा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोळ्याचे आयोजन करण्यात आले. बालगोपालापासून तर वृद्धगृहस्थांची गर्दी होती. यावर्षी दीडशे बैल जोडींनी हजेरी लावली. बैलजोडीला पुरस्कार मिळेल या आशेपोटी बैलाची सजावट कायम टिकवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे आयोजनकर्त्यांनी आंब्याच्या पानांचे तोरणही बैलजोड्यांसाठी अपुरे पडले. मंचावर झडत्या सुरु झाल्या.‘‘हे झडझळती पाण्यावर पडतीमाझा नंद्याची हो पुळ आतीमाझा नंदी टुनटुनात्याच्या पाठीवर वायला चनाजगचाळा नंदी वाडा, तो गेला हो धामनवाडाधानमवाड्याची आतला मातीपरसोडीच्या हो आखरी ताडलापरसोडीचा आखर वाकडा तिकडामाझ्या याची हो जांभाळीवाघाचा चवळा अस्सील गुरुचा चेलामारसील दहाचा उळा सांगून दे रे बेलबत्तीच्या झाडाएक नमन कवडा पारबती हरबोला हर हर महादेव’’झडती म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. यात मंसाराम वंजारी, दादाराव वंजारी, खुशाल फंदे, भाऊराव राऊत तर तरुणांमध्ये राजकपूर राऊत व विवेक वैरागडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव हटवार हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत, रघुपती फंदे, दौलत वंजारी, देवचंद सेलोकर, बंडू हटवार, कुलदीप कावळे, पृथ्वीराज शेंडे, ओमप्रकाश गेडाम, कार्तीकराम हटवार, सुनिल सेलोकर, मोतीलाल येळणे, नरेंद्र लेंडे, ऋषी लेंडे, श्याम महाराज, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ओमदेव चकोले, सरपंच मंजुळा वंजारी, उपसरपंच भाऊराव वैरागडे, श्रावण डोरले उपस्थित होते. पाहुण्यांनी बैलजोडी सजावटीचे निरीक्षण केले. उत्कृष्ट सजावटीकरिता उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यात विलास वंजारी, क्रिष्णा बावनकुडे, प्रवीण बडवाईक, श्रावण हटवार, रामेश्वर डोरले, मधुकर हटवार, विनोद वंजारी, प्रवीण हटवार, पंकज कुरंजेकर, दिशेन कंडणे, आनंद हटवार, लवा गभणे, दिलीप दादुरवाडे यांचा समावेश होता. प्रास्ताविक व संचालन पोलीस पाटील दौलत वंजारी यांनी केले. (वार्ताहर)