शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुळ व्यापाराला मागितली दोन लाखांची खंडणी; पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 15:40 IST

पत्रातून राधेशाम गुप्ता यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणीचे पैसे तुमसर येथील बस स्थानकावर एका सीटवर सोडून निघून जावे, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील नाकाडोंगरीची घटना 

भंडारा : गुळ निर्मिती करून विकणाऱ्या एका व्यापाराला पत्राच्या माध्यमातून २ लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली. सदर आशयाचे पत्र या व्यापाऱ्याच्या घराच्या दरवाज्यावर २१ फेब्रुवारी आढळले.

माहितीनुसार, राधेशाम बाबुलाल गुप्ता (७२) रा.नाकाडोंगरी ता. तुमसर असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार वयोवृद्ध असलेले राधेशाम गुप्ता हे नाकाडोंगरी येथील रहिवासी असून त्यांचा तुमसर तालुक्यात गुळ विक्रीचा व्यवसाय आहे. गुळ निर्मिती करने व लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना गुळ विकणे असा हा त्यांचा व्यवसाय आहे. २१ फेब्रुवारीला ते आपल्या घरासमोरील लोखंडी गेट उघडण्यासाठी गेले असता त्यांना गेटवर एका लाल रंगाच्या कार्डवर लिहिलेले पत्र आढळले. पत्रातून त्यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

खंडणीचे पैसे तुमसर येथील बस स्थानकावर एका सीटवर सोडून निघून जावे, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली. गुप्ता यांनी याची माहिती तात्काळ गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेत त्या दिशेने तपास सुरू केला आहे. गाव परिसर व तुमसर बसस्थानक परिसरात जाऊन गोपनीय माहिती व विचारपूस केली आहे. उल्लेखनीय म्हणजे गुप्ता यांनी तक्रारीत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

काय आहे पत्रात

गुप्ता यांच्याकडे आढळलेले पत्र हे हिंदी भाषेत आहे. या पत्रात, गुप्ता तुझी सुपारी देण्यात आली असून नागपूरचे चार शॉप शूटर लावण्यात आले आहे. तू दोन लाख रुपये मंगळवार दुपारी १२ बारा वाजेपर्यंत तुमसर बसस्थानकावरील एका खाली सीटवर सोडून निघून जा, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देऊ, असे या पत्रात नमूद केले आहे.

गुप्ता यांनी खंडणीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. सध्या बयान नोंदविण्याचे काम सुरू असून गोपनीय चौकशीही केली जात आहे. गुप्ता यांनी अजूनपर्यंत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

-विलास करंगामी, पोलीस उपनिरीक्षक व तपासी अधिकारी, गोबरवाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणीPoliceपोलिस