बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:11 AM2018-04-25T01:11:11+5:302018-04-25T01:11:11+5:30

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही.

Investigation of the leopard death in cold water | बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

Next
ठळक मुद्देआरोपी मोकाटच : वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. एकामागोमाग वन्यप्राण्यांचा जीव जात असताना त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
११ एप्रिल रोजी पलाडी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठे व्रण असल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याने जिवंत तार तोंडात घेतल्याने त्याची जीभ जळाल्याचे आढळून आले. उर्वरित सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे विजेच्या धक्कयाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आणून फेकण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून घटनेच्या दोन आठवड्यानंतरही वन विभाग आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.
ज्याठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळले त्याच परिसरात त्याचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेनंतर वन विभागाने चौकशी केली असता त्यांना अद्याप काहीही आढळून आले नाही. वन विभागाला आरोपींचा ठावठिकाणा माहित आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. एकीकडे वन आणि वन्यजीव यांच्या संर्वधनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचे असे हकनाक बळी जात आहेत. शिवाय त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा शोधही घेतला जात नसल्याने वन्यप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
'जय' नंतर 'जयचंद'ही बेपत्ता
उमरेड-कºहांडला अभयारण्यातील रुबाबदार असा जय (टी १) नावाचा वाघ दोन वर्षांपासून अचानक बेपत्ता असताना आता त्याचा अपत्य 'जयचंद' (टी ५) हा वाघही बेपत्ता आहे. तो अभयारण्य सोडून दुसऱ्या जंगलात गेल्याचीही कुठे नोंद नाही. सातत्याने वन्यप्राण्यांच्या शिकारी होणे, बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमका करतोय तरी काय? असा प्रश्न आहे. जय नंतर जयचंदने पर्यटकांना भूरळ घातली होती.

Web Title: Investigation of the leopard death in cold water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ