शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट कनेक्टीव्हिटी योजना ठरली कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

लाखांदूर: जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये, संस्थांना सीएससी अंतर्गत ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी गतवर्षी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्यात ...

लाखांदूर: जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये, संस्थांना सीएससी अंतर्गत ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी गतवर्षी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्यात आली. मात्र, या कनेक्टीव्हिटी अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात अनियमित व अपर्याप्त वाय‌फायसह इंटरनेट सेवा उपलब्ध होत असल्याने सदर योजना कुचकामी ठरल्याची चर्चा जनतेत केली जात आहे. शासनाच्या भारत फेज-१ ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टीव्हिटी तरतुदीनुसार सीएससीअंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये व संस्थांना इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्यात आले होते. सदर कनेक्टीव्हिटीअंतर्गत ग्रामपंचायतीसह सर्व शासकीय कार्यालये व संस्थांना सदर सुविधा पुरविण्यात आली. या सुविधेंतर्गत संबंधित कार्यालय,संस्थांना नियमित वाय-फायसह इंटरनेट सेवा उपलब्ध होणे अपेक्षित होते.

एवढेच नव्हे, तर सदर सेवा पहिल्या एक वर्षासाठी नि:शुल्क तर पुढील वर्षापासून सीएससीअंतर्गत मासिक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्वच ६२ ग्रामपंचायतींत व तत्सम क्षेत्रातील शासकीय कार्यालये व संस्थांना सदर कनेक्टीव्हिटी देण्यात आल्याची माहिती आहे. सदर कनेक्टीव्हिटी बीबीएनएलअंतर्गत देण्यात आली असून पर्याप्त व नियमित वायफायसह इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक सयंत्रदेखील लावण्यात आले आहे. मात्र, सदर सुविधा उपलब्ध करुन देखील तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत या सुविधेंतर्गत अपर्याप्त व अनियमित सेवा उपलब्ध होत असल्याने सदर योजना कुचकामी ठरल्याची ओरड होत आहे.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवून शासनाच्या भारतनेट फेज - १ ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टीव्हिटी तरतुदीनुसार पर्याप्त व नियमित सेवा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जनतेत केली जात आहे.