साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूल (सीबीएसई) साकोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य पांडुरंग राऊत, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, तसेच वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात लोकमान्य अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कूलच्या पहिल्या मुख्याध्यापिका मंगलाबाई चन्नेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रम मागील सत्रातील प्रथम येणाऱ्या मुलींच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्त्वाला, नेतृत्त्वाला, सहनशक्तिला, त्यागाला, वात्सल्य, मांगल्य, मातृत्व प्रत्येक कार्यात सहभाग दर्शविणाऱ्या सर्व महिलांना, त्यांच्या प्रेमाला नमन करून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका रोझी पठान यांन विद्यार्थ्यांना थोर महिलांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह व वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास यांनी जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर महिलांनी केलेल्या बहुमूल्य कार्याची विद्यार्थ्यांना प्रचिती आणून दिली. तस्मिया पठान या विद्यार्थिनीने तर नारी शक्ती, महिला सबलीकरण याविषयी अतिशय मोलाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महिला शिक्षिकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांनी सामाजिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर केलेल्या कार्यांची अतिशय मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोझी पठान यांनी केले. लता कटरे यांनी आभार मानले.