अड्याळ : स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांचे मनोरंजन करणे हे सोनकांतसाठी रोजचे काम झाले आहे. त्या धोकादायक कलेपोटी जे मिळेल त्यात समाधान ठेवून आपल्या कलेने अड्याळवासीयांना आपलेसे केले आहे. दररोज सायंकाळी हजारोंच्या संख्येने मंडईपेठ येथील भव्य पटांगणावर या थरारक कलेचे सात दिवसीय आयोजन एकट्या सोनुकांत नेच केले आहे.नेवयीमाला (भिलाई) येथील रहिवासी ४० वर्षीय सोनुकांत विलीयमसन मागील २६ वर्षापासून कसरतीचे व जीवावर बेतणारे कार्यक्रम मोठ्या हिमतीने करीत आहे. सोनुकांत लोकांना जे खेळ दाखवितो त्यात शरीरावर आग लावणे, शरीरावर सुयांची रांग, जळत्या गरम लोखंडी छडीला जिभेचे चुंबने, काच साठा तालावर सायकलवर नृत्य करणे, छातीवर १५० किग़्रॅ. वजनाचे दगड फोडणे व इतर लहान मुलांना आवडणारे बाल खेळ दाखवत असतो.हे सर्व खेळ त्याने आपल्या वडिलांकडून अवगत केले. भिलाई येथील एसएफ बटालियनमध्ये वडिल नोकरीवर होते. परंतु कमी वेतन असल्याने नौकरी सोडून सर्कसचे काम हाती घेतले व त्यांच्यासोबतच राहून आज ही कला दाखवितो.सोनुकांतला वेगवेगळे प्रदेशातील मान्यवरांकडून पारितोषिक सुद्धा मिळाले आहेत. आजपर्यंत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार, राजस्थान व महाराष्ट्रामध्ये शेकडो जिल्ह्यातील गावात आपला खेळ, कला दाखविली आहे. फक्त दुसरा वर्ग शिकलेला सोनुकांत ख्रिश्चन असला तरी सर्वांना रामराम, नमस्कार करतो. तो म्हणतो की सर्व जातीच्या व धर्माच्या व्यक्तीचे रक्त एकाच रंगाचे आहे तर भेद कुठला व कशासाठी? असा प्रश्न हा खेळ पाहताना आल्यावाचून राहत नाही.
पोटासाठी जीवघेणी कसरत
By admin | Updated: May 13, 2015 01:01 IST