शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अधिकाऱ्यावर शाई फेकली

By admin | Updated: July 30, 2015 00:46 IST

अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनभंडारा : अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणाच्या आरोपानंतर २८ जुलै रोजी पुन्हा एका अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई टाकून त्यांची मानहानी करण्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन संबंधितांना अटक करावी, जेणेकरुन अशा बाबींना आळा बसेल यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक बा.सु. मरे हे काल मंगळवारला आपल्या कार्यालयात कामकाज करीत होते. त्यावेळी सुशिक्षित बेरोजगार सोसायटीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भूपेंद्र मिश्रा हे कार्यालयात मरे यांना भेटायला आले. त्यांनी जिल्हा माहिला व बाल विकास कार्यालयात कामासाठी ५ ते ६ लोकांची मागणी केली होती. त्या कामाबाबत काय झाले अशी मरे यांना विचारणा केली. मात्र विभागाने दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता न केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव परत पाठविल्याचे सहाय्यक संचालक मरे यांनी मिश्रा यांना सांगितले. त्यावर मिश्रा यांनी तुम्ही इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालता असे आरोप करीत पिशवीमधून काळया रंगाची शाईची बॉटल काढून मरे यांच्या चेहऱ्यावर व कपड्यांवर शाई टाकली. सोबत आणलेला प्लॉस्टीक चपलांचा हारही त्यांच्या गळयात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सहाय्यक संचालक यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात बोलाविले असता शर्मा यांनी चपलांचा हार कार्यालय परिसरात टाकून तिेथून पळ काढला. याप्रकरणी सहाय्यक संचालक मरे यांनी भंडारा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. तथापि पोलिसांनी अद्याप संबंधितांना अटक केलेली नाही. ही बाब गंभीर असून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. मिश्रा यांनी शासकीय कामात अडथडा निर्माण करुन शासकीय अधिकाऱ्यांची मानहानी केली. यासाठी त्यांना तात्काळ अटक करावी आणि पोलिस कोठडी द्यावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना बुधवारला निवेदन दिले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण शासनाकडे पाठवून शासकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण्यात निर्माण करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई न झाल्यास माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या निधनानिमित्त घोषित केलेला शासकीय दुखवटा संपल्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संघटन सचिव डॉ.संपत खिल्लारी , भंडारा जिल्हा समन्वय समितीचे महासचिव शांतीदास लुंगे, तिनही उपविभागीय अधिकारी तसेच अन्य सर्व विभागांचे ७० अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)