लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरासाठी भविष्यकालीन नियोजन लक्षात घेत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र यातील तांत्रिक कामे अजुनही पूर्णत्वास गेलेले नाही. परिणामी भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत १३९ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. गाजावाजा करून योजनेच्या कामाला प्रारंभही झाला. नवीन चार जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तापित करण्याचे ठरविण्यात आले. त्यादिशेने कामेही झाले. एक जलकुंभाचे काम वगळता अन्य कामे पूर्ण झाली. मात्र शहरातील काही भागात जलवाहिनी घालण्याचे काम आजही सुरू आहे. ते पुर्णत्वास कधी जाणार याबाबत नेमके कुणीही सांगायला तयार नाही.
जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्रवाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत भंडारा शहरातील विविध भागांसाठी जलकुंभ बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी तीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका टाकीचे बांधकाम आजही रखडले आहेत. दरम्यान पाणी समस्या असलेल्या भागात जलकुंभबांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
आजही होतोय दूषीत पाणीपुरवठाभंडारा शहरातील जुनी जलवाहिनी कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे गत दीड दशकांपासून शहरात दूषीत पाणीपुरवठा होत आहे. आजही शहरातील अनेक भागात पिवळसर व काळे पाणी येत आहे. यावर अजुनही तोडगा निघालेला नाही. परिणामी आरोग्याचा प्रश्न बळावला आहे.
उंचभागात पाणी पोहचेनाशहरातील उंच भागात पाणी योग्य प्रमाणात पोहचत नसल्याची नागरिकांची जुनी तक्रार आहे. ती आजही कायम आहे. परिणामी याबाबीला हेरून त्या भागात नवीन जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले. मात्र जलकुंभ एक आणि नळजोडणी अनेक यामुळे पाणीपुरवठा होत असला तरी मिळणारे पाणी अल्प असल्याची बोंब आहे. विशेष करून उंच भागात पाण्याचा प्रवाह कमी होतो. अशावेळी टिल्लूपंप लावून पाणी ओढणारे नागरिक आहेत. त्यामुळे अन्य घरांना कमी प्रमाणात पाणी मिळते. तकिया वॉर्डाला लागून असलेल्या आनंदनगर, समृद्धीनगर परिसर पाणी अल्प प्रमाणात मिळत असल्याची ओरड आहे.