शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
3
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
4
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
5
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
6
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
7
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
8
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
9
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
10
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
11
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
12
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
13
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
14
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
15
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
16
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
17
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
18
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
19
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
20
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी यासाठी शासनाने नियम दिले आहेत. कोरोना व्हायरस काय व शरीरात आपल्या प्रवेश तर करणार नाही ना? कोरोनामुळे माझी नोकरी गेली, माझ्या कुटुंबाचे काय होईल, मी जगणार की नाही अशा नानाविध समस्यांचा कल्लोळ मानवी मनात रान माजवित आहे. याच मानसिक तणावात आजची पिढी गुरफटत असल्याचे दिसुन येत आहे.

ठळक मुद्देकोरोना म्हणजे संघर्षाचा काळ : हसा, बोला, मन मिसळवा-हीच खरी अँटीबाॅडीज

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आज हे काय घडताय, उद्या काय घडेल या चिंतेतच कोरोना महामारीने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडविले आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. चिंतेचे मुळ कारण माहित असतानाही अनपेक्षितपणे मानसिक स्तरावर त्यावर परदा टाकुन स्वत: चिंताग्रस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मानसिक ताण वाढल्याने जगायचे कसे हा खरा प्रश्न आजघडीला उपस्थित होत आहे. मानसोपोचार तज्ज्ञांच्या मते औषधांपासून निर्माण होणाऱ्या अँटीबाॅडीज पेक्षा हसा, बोला, मन एकमेकांत मिसळवा यातूनच खरी अँटीबाॅडीज तयार होईल असा सकारात्मक सल्लाही देत आहेत. कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी यासाठी शासनाने नियम दिले आहेत. कोरोना व्हायरस काय व शरीरात आपल्या प्रवेश तर करणार नाही ना? कोरोनामुळे माझी नोकरी गेली, माझ्या कुटुंबाचे काय होईल, मी जगणार की नाही अशा नानाविध समस्यांचा कल्लोळ मानवी मनात रान माजवित आहे. याच मानसिक तणावात आजची पिढी गुरफटत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने कोविड हेल्पलाईन अंतर्गत समस्या सांगुन त्याचे निदान करण्याचे कार्य सुरु केले आहे. मात्र तिथे काॅलची संख्या मर्यादित असली तरी सर्वाधिक काॅल हे पुरुषांचे असल्याचे दिसून आले आहे. बाहेर वावरताना आपल्याला कोणती काळजी घेण्यासोबतच औषधांची माहितीही विचारली जाते. त्यातही काही जण वैयक्तिक प्रश्नही विचारण्यात असल्याचे सांगण्यात येते. शहरात बोटांवर मोजण्याइतपतच मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडेही कोरोना काळात कौटुंबिक समस्या घेऊन अनेक जण आलेत. मोबाईलवर बोलून मनातील व्यथाही सांगितल्या. त्यात कोरोनामुळे घडलेल्या दुष्परिणामाचा पाढाच वाचल्याचे तज्ज्ञ सांगतात. सध्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी जीवंत राहणे व सकारात्मक दृष्टीकोण ठेवणे याच दोन बाबी स्वाभाविकपणे जपाव्या असा सुरही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसची जगभर पसरलेल्या साथीमुळे खचून जाऊ नका. मनालाही ब्रेक द्या. अतिविचार शरीरावर परिणाम करतो. निसर्गत: जीवन जगण्याचा प्रयत्नच मनाला आधार देईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.

असे आहेत तरुणांचे प्रश्नसध्या अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे कोरोना परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगाराही हिरावले. वाटेल ते कार्य करुन कुटुंबाचा तर कधीकधी स्वत:चा खर्च भागवित आहेत. येणारी स्थिती कशी असेल या विवंचनेत आजचा तरुण गुरफटला आहे. आजूबाजूला इतके घडत असताना त्याविषयी वाचावेसे वाटणे, अपडेट राहणे आजच्या तरुणांची मानसिकता आहे. परंतु त्यातून काळजी वाढू शकते. आधीच तरुणांसमोर नोकरी, करीअर, पक्के घर यासह अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्यात कोरोना महामारीने स्वप्नांचा अपेक्षाभंग केला असुन या तरुणाईला मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज आहे.

पुरुष सर्वाधिक तणावातसंसाराचा गाढा आजघडीला स्त्री पुरुष दोन्हीही ओढतात. परंतु एखाद्या कुटुंबात पुरुषच कमावता असताना व कोरोनामुळे नोकरीही किंवा आर्थिक स्त्रोत बंद झाल्यास याचा ताण निर्माण होतो. तज्ज्ञांना आलेल्या काॅलवर सर्वाधिक पुरुषच तणावात असल्याचे दिसून आले.

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?महिला अश्रूंमधून भावना व्यक्त करतात, परंतु पुरुष रडला की त्याला दुबळा समजल्या जाते. ही सर्वसाधारण समजूत आहे. परंतु पुरुष रडला म्हणून तो कमजोर होत नाही. कधीकधी तणावाचा बांध मनात दडवून चेहऱ्यावर हसू आणणाराही पुरुष असतो. कोरोना संकटकाळात नानाविध समस्या भेडसावत असतानाही पुरुष ही भावना व्यक्त करतो. मात्र तो कधी सरळ तर कधी अन्य पद्धतीने बाब सांगत असतो. त्यामुळे पुरुषही स्वत:ला ब्रेक देऊन मनात बदल घडवुन आणतात तेही आपल्या भावना व्यक्त करतात. जमेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात, चांगला आहार आणि मन मोकळे करुन मनातील गुरफट दुर करतात. आजघडीला कोरोनाचे टेंशन सर्वांनाच असले तरी त्यात असाध्य अशी कुठलीही बाब राहिली नाही.

मित्रांनो, खचून जाऊ नका

मित्रांनो काळ अनपेक्षित असला तरी खचून जाण्याची काहीही गरज नाही. सकारात्मक विचार शरीरात सर्वात जास्त अँटीबाॅडीज तयार करायला मदत करतात. मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विचार म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती नाही. तरुण असो की अन्य व्यक्ती चिंता किंवा स्ट्रेस करुन त्या समस्येवर विजय मिळविता येत नाही. एका बुडबुड्यासारख्या क्षणानंतर सर्व काही ठिक होते. स्वत:च्या आत्मविश्वासावर केंद्रीत होऊन कार्य करा. आलेला संकटकाळ निघून जाईल. परंतु सकारात्मक दृष्टीकोण जीवन बदलेल यात शंका ठेवू नका.-रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या