शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वाढली चिंता; उकाडा वाढला

By admin | Updated: September 8, 2015 00:34 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे.

दुष्काळसदृश स्थिती : मान्सून परतीच्या मार्गावर, पाऊस बेपत्ता, किडीचा प्रादुर्भाव, भारनियमनाच्या चक्रव्यूहात शेतकरीभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)१.६३ लाख हेक्टरवर करपाचा प्रादुर्भावभंडारा : जिल्ह्यात भात पिकावर करपा, खोडकिडा आदी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. जिल्हयातील १ लाख ६३ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली. या लागवड क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. महागडी औषधी खरेदी करुन कीड, रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.कीड नियंत्रक व कीड सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही गावात करपा रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसून आलेले आहे. हा रोग बुरशीपासून होतो. या रोगाच्या प्रादुर्भावास ढगाळ वातावरण, दमटपणा व कमी उष्ण हवामान म्हणजे २४ ते २६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल ठरते. त्यामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखडी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात. लोंबीच्या दांड्यावरही हा रोग होतो. त्यामुळे दांडा कुजतो. यास मानमोडी असेही म्हणतात. रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोग आढळल्यास नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, शेतातील रोगग्रस्त धसकटे व तणांचा नायनाट करावा, शेणखताचा वापर करावा, ट्रायसायक्लोझोल ७५ डब्लू पी ०.६ ग्रॅम प्रती लिटर किंवा इप्रोबेनफॉस ४८ इसी २ ग्रॅम प्रती लिटरकिंवा आयसोप्रोथीओलीन ४० इसी १.५ मिली प्रती लिटर किंवा कारप्रोपॅमीड ३० एससी १ मिली प्रती लिटर किंवा कार्बन डॅझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रती लिटर किंवा कासूगामायसीन ३ एसएल २.५ ग्रॅम प्रती लिटर यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी, अशी उपाययोजना कृषी विभागाचे भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी सुचविल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)