लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात झाले तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते. परंतु, पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा उष्णतेमुळे होणाऱ्या डीहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे डीहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.
दोन लिटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यतः आरोग्यतज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, यासंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टीप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे यासंदर्भातही आरोग्यतज्ज्ञ सल्ला देतात.
उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?उन्हाळ्याच्या दिवसांत गरम वातावरण असले, तरी सामान्यतः दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लिटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे.
शरीरात जास्त पाणी झाले तरप्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लिटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे. यामुळे अनेक आजार होतात. जास्त पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.
"२० टक्के पाणी अन्नापासून, तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी प्यायल्याने लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. यासाठी पाणी अधिक घ्यावे."- डॉ. नितीन तुरस्कर, भंडारा