वैनगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:45+5:30

भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे.

Increase in pollution of Wainganga River, inappropriate to drink water | वैनगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, पाणी पिण्यास अयोग्य

वैनगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, पाणी पिण्यास अयोग्य

Next
ठळक मुद्देनागनदीचे सांडपाणी । निरी म्हणते, पाण्याच्या संपर्कातील व्यक्तींवरही परिणामाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातून वाहनाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीतून येणाऱ्या सांडपाण्यामुळे दूषीत झाले असून गोसेखुर्द धरणामुळे साठवलेल्या पाण्यात जलवनस्पती व जलकिड्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीच्या पाण्यात गढूळपणा मोठ्या प्रमाणात वाढला असून वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही, असा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) ने दिला आहे. मात्र त्यानंतरही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेती, मनुष्य आणि जनावरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे. दूषीत पाण्यात जीवानुचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यास अजिबात योग्य नाही, असा स्पष्ट अहवाल निरीने तयार केला आहे. निरीच्या वैज्ञानिकांनी जून २०१८ मध्ये गोसेखुर्द धरणाच्या परिसरातून नदीच्या पाण्याचे परीक्षण केले होते. त्यानुसार एकीकडे थांबलेल्या पाण्यावर ईकॉर्निया वनस्पतीचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे नागनदीही या प्रदूषणात वाढ करीत आहे.
वैनगंगेच्या तिरावरील शेतामध्ये सिंचनासाठी पाणी वापरले जाते. परंतु हे पाणी पिकांसाठी आणि या पाण्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठीही धोकादायक होण्याची भीती आहे. नदीच्या पाण्यातील पीएचस्तर, आम्लता, अ‍ॅसिडीटीचास्तर सामान्य आहे. शिवाय कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडीयम, पोटॅशियम आदी रासायनिकांचा स्तर सामान्य असून मॅग्निज वगळता जड धातूचे प्रमाणही नगन्य असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये केला आहे. वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला दहा एनटीयु तर तळाशी १७ एनटीयु आहे. पाच एनटीयुचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वैनगंगा बचाव अभियान नागरी समितीचे नितीन तुमाने यांनी पुढाकार घेतला आहे.

निरीच्या सूचना
ऑरगॅनिक प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रातील जलपर्नी वनस्पती काढणे गरजेचे आहे. पिण्यासाठी पाण्याचा वापर योग्य शुद्धीकरणानंतरच शक्य आहे. मॉयक्रोबिलियन प्रादूर्भावाचा धोका असल्याने सुरक्षित सिंचन प्रॅक्टीस आवश्यक आहे. नागनदीचे सांडपाणी वैनगंगेत सोडने, थांबविणे गरजेचे आहे.

वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यासह पर्यावरण मंत्र्यांना पत्र देण्यात आले. परंतु समस्या कायम आहे. भंडारा जिल्ह्याचा हा वनवास केव्हा संपेल हा प्रश्न आहे.
-मो.सईद शेख, संस्थापक अध्यक्ष, ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्था, भंडारा.

Web Title: Increase in pollution of Wainganga River, inappropriate to drink water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी