शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:30 IST

करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : १५ टक्के राखीव जलसाठा, एका तलावापासून पाच लाखांपर्यंतचे उत्पादनाचा लक्षांक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीही १० किलो मत्स्य जिऱ्यांपासून एकाच १७ एकराच्या तलावात ५ लाखांचे मासोळ्यांचे उत्पादन हाती पडणार असल्याचे मनोगत ढिवरबांधवांनी व्यक्त केले आहेत. करडी परिसरात जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये ल.पा. व मामा तलाव दुरुस्तीची ५ कामे झाली. तर जलसंधारण विभागाचे वतीने ल.पा. व मामा तलावांचे २ कामे झालीत. सन २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव (करडी), बोरी-पांजरा, देव्हाडा बुज., नरसिंगोला आदी गावात जलयुक्तची कामे झालीत तर सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रुपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज., जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे २००१.३ टीसीएम जलसाठा तयार होवून सुमारे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.करडी परिसरातील सर्व तलाव कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असल्याने जंगलातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठविले गेले. साठलेल्या पाण्याचा उपयोग ढिवरबांधवांसाठी वरदान ठरले. केसलवाडा, जांभोरा टोला व करडी गावातील मत्स्य उत्पादक सहकारी संस्थांनी तलावांची क्षमता ओळखून रोहा, कतला, काटवे, मिरगल, सिपनस, वाघुळ आदी मासोळ्यांचे मत्स्य जिरे टाकले. नैसर्गिक गवत व हिरवा चारा तलावात उगवल्याने तसेच जास्त काळ पाणी साठा राहिल्याने मागील वर्षीपासून मासोळ्यांचे वरघोष उत्पन्न हाती पडत आहे. यावर्षी केसलवाडा येथील ढिवरबांधवांनी पालोरा येथील १७ एकरमध्ये विस्तारलेल्या बांध तलावात १० किलो मत्स्य जिऱ्यांचा चांगला विस्तार झालेला आहे. मासेमारीतून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा विश्वास ढिवरबांधवांनी व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पालोरा, करडी व जांभोरा जंगल परिसरातील तलावांचे एक ती दीड मिटरपर्यंत खोलीकरण झाले. यामुळे मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यावर्षी बांध तलावातील १० किलो मत्स्य जिऱ्यापासून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपासून मासोळ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आहे.