शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लाखावर असंघटित कामगार, सुविधांचा पत्ता नाही

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 13:55 IST

Bhandara : ५६,८३९ नोंदणीकृत कामगार, अनोंदणीकृत कामगार मात्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात घरेलू, इमारत बांधकाम, कारखान्यातील कामगार आदी नोंदणीकृत कामगारांची संख्या ५६,८३९ इतकी आहे. यात घरेलू कामगार संख्या ६७३५, इमारत व इतर बांधकाम कामगार ३६,५११, तर २३० कारखान्यात काम करणाऱ्या १३,५९३ कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी दुप्पट कामगार असंघटित क्षेत्रात काम करताना दिसतात. मात्र या कामगारांची नोंद नाही. योजना भरपूर असल्या तरी असंघटित क्षेत्रातील कामगार हक्कापासून वंचित असल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो आहे का, शासकीय धोरणांमुळे त्यांच्या जीवनात बदल जाणवतो आहे का, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने केला. यात असंघटित कामगारांना खासगी व्यवस्थापनाकडून सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब समोर आली.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम २००८ अंतर्गत घरगडी / मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या व वैधपणे नोंदणीकृत असलेल्या कामगारांनाच विविध योजनांचा लाभ मिळतो. जिल्ह्यात २१ मे २०१२ ते डिसेंबर-२०२३ या दहा वर्षांत फक्त ६७३५ घरेलू कामगारांची नोंद आहे.

कामगारांसाठी अनेक योजना असल्याचा दावा होत असला तरी असंघटित कामगारांसाठी अद्यापही सुविधांचा अभाव आहे. योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे वास्तव आहे. अल्पशिक्षित व अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाइन प्रक्रिया समजत नाही. त्यांना कुणी समजावून देण्याचा प्रयत्नही करीत नाही. अनेकांना तर कामगार विभागाच्या योजनांची माहिती नाही. त्यांच्या नोंदणीसाठी तालुकास्तरावर केंद्रच नाही. रोजी बुडवून नोंदणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे परवडत नाही. हजारो असंघटित कामगारांची नोंदणी अद्यापही झालेलीच नाही.

असा मिळाला योजनेचा लाभ• ५५ वषर्षापेक्षा अधिक वय असणारे ३३८ कामगार ३३,८०,००० सन्मानधन• प्रसूती लाभ योजना : ४२ कामगार : २,१०,०००• अंत्यविधी लाभ योजना ९ कामगार १८,०००• कोविड-१९ लाभ : १११४ घरेलू कामगार : १६,७१,०००• ९९,१२० लाभार्थ्यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचे वितरण• जिल्ह्यात सद्यःस्थितीत २४ बांधकामांच्या ठिकाणी ३३०० कामगारांना दुपारचे भोजनडिसेंबर २०२३ पर्यंत ८२,८२९ बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी• विभागांतर्गत ६४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, अटल आवास योजनांतर्गत ६४ लाभार्थ्यांचे घरकूल अर्ज मंजूर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असंघटीत कामगार आहेत. परंतु, त्यांना किमान सुविधा व वेतनही मिळत नाही. पिळवणूक होत आहे. जीपीएफ, साप्ताहिक व अन्य सुट्ट्याही मिळत नाहीत. नियमीत काम असणाऱ्या कामगारांना नियमीत करण्यात यावे, अशी कामगार संघटनांची सातत्याने मागणी आहे.- हिवराज उके, जिल्हा सचिव, आयटक, भंडारा.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराEmployeeकर्मचारी