शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ मध्ये शिक्षकांना ७६ सुट्ट्या मात्र प्रत्यक्षात मिळणार ९२ सुट्ट्यांची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:29 IST

Bhandara : ९२ सुट्ट्यांची पर्वणीच. त्यामुळे शिक्षक कर्मचान्यांची मजाच

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी :शिक्षक कर्मचाऱ्यांना किती सुट्टधा मिळतील याबाबतची उत्सुकता लागली होती. विद्यार्थ्यांपासून तर शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष सुट्टधांच्या यादीकडे लागून राहिले होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना २०२५-२०२६ या वर्षातील रेकार्डवर ७६ सुट्ट्या आहेत. प्रत्यक्षात मात्र ९२ सुट्टयांची पर्वणीच प्राप्त झाली आहे.

नवीन वर्ष सुरू झाले. नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची प्रतीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांना लागली होती. नवीन वर्षातील सुट्ट्यांबाबत मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे यांच्या कक्षात शुक्रवारी घेण्यात आली. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून २०२५ या वर्षातील सुट्ट्या ठरविण्यात आल्या आहेत. 

उन्हाळ्याच्या सुट्टया १७ मे ते २५ जूनपर्यंत राहणार आहेत. २६ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. नियोजित सुट्ट्याच्या व्यतिरिक्त रविवार व सुट्ट्यांचे दिवस सोडण्यात आले आहेत. उन्हाळ्यात ७ सुट्टया अधिक मिळणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत. १ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. दिवाळीच्या सुद्धा रविवार व अन्य सुट्टया वगळून ५ सुट्टया अधिक मिळणार आहेत. कर्मचारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहितीही शिक्षण वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

सार्वजनिक सुट्टया २४ आहेत; परंतु प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी, मोहर्रम, गणेश चतुर्थी हे सण रविवारी येत आहेत. नियोजित सार्वजनिक सुट्टया २० ठरविण्यात आल्या आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ७६ सुट्टया ठरवून दिल्या आहेत. रविवार व अन्य सण वगळून शिक्षक कर्मचाऱ्यांना एकूण ९२ सुट्टया मिळणार आहेत. १६ सुट्ट्यांच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.

२३० असावे शाळेच्या कामकाजाचे दिवस मंजूर करण्यात आलेल्या सुट्ट्यांचे पालन प्रत्येक शाळांना करायची आहे. शाळेचे कामकाज किमान २३० दिवस राहील याची दक्षता मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे, हे येथे महत्वाचे.

३ मार्चपासून होणार सकाळपाळीत शाळा फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या शिक्षण मंडळाची परीक्षा होणार आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असतो, तसेच शिक्षकांना परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करायला जावे लागते. यामुळे ३ मार्चपासून सकाळपाळीत शाळा भरणार आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराTeacherशिक्षक