शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात सुधारणा! दररोज ₹६.७८ ते ₹१०.१७ इतका खर्च मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:03 IST

Bhandara : १ मेपासून सुधारित दर लागूः शाळेत मिळणार आहार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शालेय पोषण आहार योजनेतील प्रति विद्यार्थी खर्चात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा सुधारित दर १ मे २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो.

योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन, प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. आता केंद्र शासनाने प्रतिदिन, प्रति लाथार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ४ मार्च २०२५ च्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ६.१९ रुपये व उच्च प्राथमिक वर्गासाठी ९.२९ रुपये निश्चित करण्यात आली होती.

१ मेपासून सुधारित दरानुसार मिळणार पैसेप्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार खर्चाच्या दरास मान्यता मिळाली आहे. १ मेपासून सुधारित दरानुसार पैसे मिळणार आहेत.

प्रति विद्यार्थी किती वाढ ?नव्या शासन निर्णयानुसार प्रतिदिन, प्रति लाभार्थी आहार खर्च प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी ६.७८ रुपये, तर उच्च प्राथमिक लाभार्थी गटासाठी १०.१७रुपये एवढे दर निश्चित करण्यात आले आहे.

तेल-मिठासाठी खिशातून करावा लागायचा खर्चयापूर्वी शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी अनेकवेळा निधीअभावी शिक्षकांनाच तेल-मिठाचा खर्च करावा लागायचा. आता शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागणारा खर्च वाचण्यास मदत मिळणार आहे.

किती विद्यार्थ्यांना लाभ ?पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळली.

टॅग्स :bhandara-acभंडारा