शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुग्धजन्य पदार्थांची मध्य प्रदेशांतून आयात

By admin | Updated: October 25, 2014 22:34 IST

मध्य प्रदेशातून महाराष्ट्राचा सीमावर्ती शहरात दुग्धजन्य पदार्थासह ‘खोवा’ मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने आणला जात आहे. हा खोवा तुमसर, भंडारा व नागपूरच्या बाजारात विकले जात आहे.

पदार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : तुमसर, भंडारा शहरात दररोज येते खेपतुमसर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्राचा सीमावर्ती शहरात दुग्धजन्य पदार्थासह ‘खोवा’ मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने आणला जात आहे. हा खोवा तुमसर, भंडारा व नागपूरच्या बाजारात विकले जात आहे. या खोव्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह असून दुग्धजन्य पदार्थाच्या वाहतुकीबाबत अन्न व पुरवठा प्रशासन विभाग अनभिज्ञ आहे.महाराष्ट्राच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत. तुमसर-कंटगी व तुमसर-वाराशिवनी हा आंतरराज्यीय महामार्ग तुमसर तालुक्यातून जातो. बावनथडी व वैनगंगा नदीपलीकडून मध्य प्रदेश राज्याच्या सीमा सुरु होतात. नदीपलीकडील मध्य प्रदेशातील शेकडो गावात दुभत्या जनावरांची संख्या मोठी आहे. या गावापासून मध्य प्रदेशातील बालाघाट हे एकमेव शहरही लांब अंतरावर आहे. या शहरात दुग्धजन्य व खोव्याला पाहिजे तेवढी मागणी नाही. त्यामुळे या परिसरातील स्थानिक छोटे मोठे व्यापाऱ्यांनी तुमसर, भंडारा व नागपुरकडे आपला मोर्चा वळविला आहे. स्थानिक व्यापारी कमी किमंतीत दुग्धजन्य पदार्थ व खोवा घेतात. त्यानंतर हा खोवा आणि दुग्धजन्य पदार्थ अधिक किंमतीत महाराष्ट्रातील लगतच्या शहरात विकतात. मागील अनेक महिन्यापासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. नदीअलीकडे दोन्ही राज्याचे तपासणी नाके आहेत. तरीसुद्धा त्याठिकाणी तपासणी केली जात नाही. परिणामी या पदार्थाची राज्याच्या सीमेत आवक सुरू आहे. तुमसर व भंडारा येथील चारचाकी वाहने दुध खरेदी करुन दररोज आणतात. या पदार्थाच्या गुणवत्तेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासनाची या आयात - निर्यातीला परवानगी आहे का? याबाबत अनभिज्ञता आहे.मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूर येथून दुग्धजन्य पदार्थाची नियमित निर्यात होत आहे. भंडारा जिल्हा मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन विभाग असून या विभागात डझनभर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी अजुनपर्यंत तपासणी व कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. तुमसर, भंडारा येथील मिष्ठान्न दुकाने, हॉटेलात दुग्धजन्य पदार्थाच्या तपासणीची माहिती घेतल्यास सत्य उघडकीस येऊ शकते. परंतु मांजरीच्या गळयात घंटा बांधणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)