शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी घटनास्थळी पोहोचून अरविंद मुंडे नामक व्यक्तीचे मैसी फर्ग्यूसन कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी २८७५ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जप्त केले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सकाळच्या सुमारास चुलबंद नदीतील दोन विविध घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दोन विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन भिन्न ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना घडली आहे. ही कारवाई ९ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनेगाव व दिघोरी मोठी येथे स्थानिक महसूल व दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे.पोलिसांनी रेतीसह पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कारवाईत ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजुरांविरुद्ध गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला, तर स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत केलेल्या कारवाईत रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी घटनास्थळी पोहोचून अरविंद मुंडे नामक व्यक्तीचे मैसी फर्ग्यूसन कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी २८७५ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जप्त केले आहे.तर अन्य एका घटनेत स्थानिक दिघोरी मोठी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ एजी ३००९ जप्त करून ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजूरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सुभाष भिवा मेश्राम (४०) सह ईश्वर देविदार बानेवार (३२), गोपाल देविदास बानेवार (२८) व डेविड रमेश गोटेफोडे (२८) आदी हमाली करणाऱ्या मजुरांविरोधात गुन्हा नोंद करीत रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला आहे. सदरची कारवाई दिघोरी/ मोठी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विनोद मैंद, घनश्याम वनवे, मानका शेंडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रात्रीच्या सुमारास होतेय तस्करी - मागील काही दिवसांपासून तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी गटातून रात्रीच्या सुमारास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे रेती चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :sandवाळू