शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

अभयारण्य परिसरातून सागवनांची अवैध तस्करी

By admin | Updated: May 19, 2016 00:29 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातून सागवानांची होणारी अवैध तस्करी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उजेडात आली.

वन विभागावर दबाव आणण्याचा प्रयत्न

भंडारा : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातून सागवानांची होणारी अवैध तस्करी वन विभागाच्या सतर्कतेमुळे उजेडात आली. याप्रकरणी ट्रकचालक जोगेंद्र अशोक निर्वाण (३३) रा. लाखनी याला अटक करून त्याच्यावर भारतीय वन अधिनियम ४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पवनी तालुक्यातील पाऊणगाव शिवारातून अवैधरीत्या सागवनाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भिवापूर वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपाल आर. डी. वलथरे यांनी रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह नागपूर-गडचिरोली महामार्गावरील भिवापूर चेक पोस्ट नाक्यावर सापळा रचला. पाऊणगावकडून नागपूरच्या दिशेने निघालेला एमएच-३६/एफ-२०९७ क्रमांकाच्या ट्रकमधून अवैधरीत्या सागवनाची वाहतूक केली जात असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. या कारवाईत ५६ हजार रुपयांच्या वैध मुद्देमालासह १.७३ घनमीटर अवैध सागवन आढळून आले. त्याची किंमत ३१,३९४ रुपये आहे. तर ४९५० रुपयांचा अवैध जळाऊ भर, ७,२५० रुपयांचा चॉक टिंबर तसेच पाच लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण ५ लाख ९९ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा भिवापूर वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ अवैध सागवानाचा ट्रक जप्त करताच मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर अनेकांनी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केले. पवनी येथील एका स्वयंभू नेत्याने तर बड्या नेत्यांपासून ते मंत्रालयापर्यंतच्या ओळखीचा दाखला दिला. कंत्राटदार नरेश तलमले हासुद्धा यावेळी हजर होता. परंतु, वन विभागाने ताठर भूमिका घेत कारवाई केली. (नगर प्रतिनिधी)