शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मापुरी घाटातून होतेय रेतीची अवैध तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

धर्मापुरीवरुन बारव्हा, खोलमारा, जैतपूर व इतर परिसरात ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करुन विक्री केली जात आहे. रेतीने भरलेले ट्रॅक्टर, ओव्हरलोड टिप्पर यासारख्या जड वाहतूकीमुळे बोथली ते धमार्पुरी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करत प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील महसूल विभाग सुस्त, रस्त्यांची झाली दुरावस्था

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्यापही मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे याचा फायदा रेती माफिया घेत असल्याचे चित्र बारव्हा परिसरातील आहे. लाखांदुर तालुक्यातील धर्मापुरी, बोथली, पांढरगोठा रेतीघाटातून दररोज रात्रीच्या सुमारास १५ ते २० ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करुन त्याची बारव्हा, लाखांदूर परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे.गावातील काही लोकप्रतिनधी व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि काही स्थानिक जनतेला पैशाचे आमिष दाखवित रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक केली जात आहे. यामध्ये थेट तस्करांना स्थानिक ग्रामपंचायतीची पूर्णपणे सहकार्य असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.रेती घाटांवरुन दररोज रेती भरलेले ट्रक, टॅक्टरची सरार्सपणे वाहतूक सुरू असून रेती माफियांवर संबंधित महसूल विभागाने कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.धर्मापुरीवरुन बारव्हा, खोलमारा, जैतपूर व इतर परिसरात ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करुन विक्री केली जात आहे. रेतीने भरलेले ट्रॅक्टर, ओव्हरलोड टिप्पर यासारख्या जड वाहतूकीमुळे बोथली ते धमार्पुरी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करत प्रचंड त्रास सहन करावा लागतो.रेती घाटांवरुन रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक करुन देण्यासाठी सर्वकाही आलबेल असल्याची चर्चा बारव्हा परिसरात आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या सुमारास १५ ते २० ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक सुरू असताना कुठलीच कारवाई केली जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीररित्या दखल घेऊन या ठिकाणी धाड घालून रेती माफियांचे मुसके आवळण्याची आवश्यकता आहे.लाखांदूर तहसील कार्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी घाटातील रेती बारव्हा येथील तलाठी कार्यालयसमोरुनच नेत असतात. मात्र रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर महसूल विभागाने अजूनपर्यंत कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.खुल्या जागेत रेतीची डम्पिंगपावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या काळात रेतीची मागणी लक्षात घेता रेती माफीयांनी बारव्हा परिसरातील मोकळ्या जागेत रेतीची डम्पिंग केली आहे, असे असतांना महसूल विभाग मात्र रेतीसाठे जप्त करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्मचारी व रेतीमाफीयांमध्ये साटेलोटे असल्याचे लाखांदूर तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.

टॅग्स :sandवाळू