नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:39+5:30

तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे.

Illegal outburst of sand from the riverbed | नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

googlenewsNext
ठळक मुद्देवैनगंगा, बावनथडी नदी पात्र : कोट्यवधीचा महसूल पाण्यात, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लिलाव नसलेल्या वैनगंगा, बावनथडी नदी पात्रातून पुन्हा रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाचा येथे आशिर्वाद आहे. राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. रेती उपसा सुरु प्रकरणी दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. तुमसर तालुक्यातील पांढºया शुभ्र रेतीला नागपूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटांतून अवैध नियमबाह्य रेतीची चोरी करणे सुरु आहे. मध्यंतरी रेती उपसा बंद होता. पुन्हा तो सुरु करण्यात आला आहे.
नदी पात्रात ट्रॅक्टर घालून मजूरांच्या माध्यमातून रेती नदीकाठावर डम्पींग केली जाते. त्यानंतर ती जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरली जाते. दररोज राजरोषपणे अवैध रेतीचे ट्रक नदीघाटावरुन रवाना होत आहे. महसूल प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक रेतीचा उपसा करुन रेतीची विल्हेवाट लावण्यात रेती तस्कर यशस्वी झाले आहेत.
नदी घाट असलेल्या गावातील ट्रॅक्टर येथे भाडयाने घेण्यात येते. त्यांना रोजगार देण्याच्या नावाखाली सर्रास रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रेती तस्करांनीही काही ट्रॅक्टर या कामात लावले आहेत. नदी काठावर जेसीबी येथे ठेवली आहे. जेसीबीने ट्रकमध्ये रेती भरली जाते. सर्रास रेती चोरी सतत सुरु असतांना महसूल प्रशासनाकडून आतापर्यंत चौकशी झाली नाही. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनीही यासंदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नाही. येथील रेती उपसा दबावतंत्र की अर्थकारणामुळे सुरु आहे हा संशोधनाचा विषय आहे.
रेती उपसा व चोरी संदर्भात अनेक कडक नियम आहेत परंतु कारवाई होत नाही. पर्यावरणाला नुकसान पोहचत आहे. नदी घाट बचावाकरीता कुणीच वाली नाही. पर्यावरण प्रेमीही येथे समोर येत नाही. नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे. केवळ उंटावरुन शेळया हाकण्याचा प्रकार येथे सुरु आहे. गुणवत्ता प्राप्त व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.
केवळ एकच रेती घाटाचा लिलाव
मागील चार वर्षापासून तुमसर तालुक्यात प्रचंड चोरीने रेतीचा उपसा करण्यात आला. महसूल प्रशासनाने सात रेतीघाट लिलावात समावेश केला होता. केवळ एका रेती घाटाचे येथे लिलाव झाला. इतर घाट लिलाव झाले परंतु नदी पात्रात रेती नाही म्हणून रेती कंत्राटदारांनी न्यायालयाचे दार ठोठावले. नदी पात्र पोखरलेले असल्याची कंत्राटदारांची तक्रार आहे. रेतीची सर्रास चोरी होत असतांना महसूल प्रशासनाने तुमसर तालुक्यात एकालाही आर्थिक दंड प्रकरणाची कारवाई केली नाही, हे विशेष.

Web Title: Illegal outburst of sand from the riverbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू