शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तुमसर तालुक्यात कोट्यवधींच्या रेतीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:24 IST

तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या बाम्हणी रेती घाटातून कोट्यवधींच्या रेतीचे सर्रास खनन गत काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल येथे बुडत आहे.

ठळक मुद्देसात रेतीघाट तस्करांना मोकाट : जिल्ह्यात शून्य दंड असलेला एकमेव तुमसर तालुका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या बाम्हणी रेती घाटातून कोट्यवधींच्या रेतीचे सर्रास खनन गत काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल येथे बुडत आहे.भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका वगळता सर्व सहा तालुक्यातून रेती तस्करांकडून ७८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात सर्वात जास्त १३ रेतीघाट एकट्या तुमसर तालुक्यात आहेत. शुन्य दंड असलेला हा एकमेव तालुका ठरला आहे. दररोज येथील नदीपात्रातून रेतीचे खनन सुरू आहे. बाम्हणी रेतीघाट सध्या रेती तस्करांकरिता वरदान ठरत आहे.तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या चार किमी अंतरावर बाम्हणी हे गाव आहे. महसूल विभागाने येथील रेती घाटाचा लिलाव केला होता. परंतु त्याला न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. परंतु राजरोसपणे दिवसभर येथे रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेती उत्खननात आठ ते दहा जणांचा समावेश आहे. नदीपात्रात ट्रॅक्टरने रेतीची उचल करून नदी काठावर ती रिकामी केली जाते. त्यानंतर जेसीबीने ट्रकमध्ये तिचा भरणा केला जातो. चार ते पाच हजारात ट्रकमधील रेतीची विक्री करण्यात येते. सदर ट्रक नागपूर येथे १३ ते १४ हजार रुपयाात विकला जातो.वैनगंगेच्या रेतीला नागपूर व इतर शहरात मोठी मागणी आहे. दिवसभर येथील नदीपात्रात ट्रॅक्टरची मोठी वर्दळ असते. येथे मोठे अर्थकारण दडले आहे. दिवसाढवळ्या कोट्यवधींची रेती येथे चोरी जात आहे. महसूल प्रशासन येथे दडपणाखाली दिसत आहे. दडपण कोण आणीत आहे हे सर्वश्रूत आहे, परंतु किमान महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करण्याची येथे गरज आहे.'लोक सांगे ब्रम्हज्ञान पुढे कोरडे पाषाण' अशी स्थिती येथे महसूल प्रशासनाची झाली आहे. रोजगाराचा मुद्दा येथे पुढे रेटला जातो, परंतु त्याकरीता तुमसर तालुक्यात १३ रेती घाट आहेत. त्यापैकी महसूल प्रशासनाने यावर्षी सात रेती घाटांचा लिलाव केला होता. यात चारगाव, सोंड्या, लोभी, बाम्हणी, तामसवाडी, आष्टी, सक्करदरा या घाटांचा समावेश होता. परंतु सध्या ही रेतीघाट बंद आहेत. याशिवाय वैनगंगा नदीपात्राजवळील सहा ते सात घाट असून या सर्व रेती घाटांतून नियमीत रेती खणन सुरू आहे.रेती उत्खनन करणाऱ्यांना येथे आशिर्वाद असून महसूल अधिकाºयांवर येथे दडपण आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी तुमसर तालुक्यातील रेतीघाटांवर कारवाई करूच शकत नाही हे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात चोरट्यांकडून दंड वसूल करण्यात आला, परंतु तुमसर तालुक्यात दंड वसूल झाला नाही.जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाचीशुन्य दंड असलेला तुमसर तालुका एकमेव तालुका जिल्ह्यात ठरला आहे. त्यामुळे येथील महसूल प्रशासनातील अधिकाºयांचा जाहीर सत्कार करण्याची गरज आहे. तुमसर तालुका त्याकरिता आदर्श म्हणून त्याचा कित्ता इतर तालुक्यांनी गिरविण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन दडपणाखाली आहे काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. भरदिवसा रेती नदीपात्रातून खननाचे पूरावे 'लोकमत'कडे उपलब्ध आहेत. मसहूल प्रशासन येथे कारवाई करेल काय, कोट्यवधींचा महसूल येथे राज्य शासनाचा बुडत आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्तव्य कठोर कारवाई करणार काय, याकडे तुमसर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.