शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यावर दारू प्याल तर पडतील बेड्या; चालकाला लाखोंचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 23:26 IST

दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज आहे की नाही, हा प्रश्न पडताे. पैसे जास्त दिले की, काेणत्याही चायनीज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजरीत्या दारू उपलब्ध हाेत आहे. पण ढाब्यांवर दारू प्यायल्यावर बेड्या पडणार असून चालकाला लाखाेंचा दंड हाेणार आहे, पण ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर केव्हा हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा भंडारा पाेलिसांनी ढाबा चालकांवर माेठी कारवाई केली नाही. काेराेना काळ वगळता या ढाब्यांवर एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्य मार्गावरील ढाबे आणि शहरातील काही चायनीज सेंटरवर सर्रास दारू विक्री केली जाते. त्यामुळे कुठेही, कधीही दारू सहजतेने उपलब्ध हाेत आहे. त्यामुळे  दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज आहे की नाही, हा प्रश्न पडताे.पैसे जास्त दिले की, काेणत्याही चायनीज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजरीत्या दारू उपलब्ध हाेत आहे. पण ढाब्यांवर दारू प्यायल्यावर बेड्या पडणार असून चालकाला लाखाेंचा दंड हाेणार आहे, पण ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर केव्हा हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ढाबा चालकांवर कारवाई करणार कोण? महामार्गावरील अनेक ढाब्यांवर रात्रीच्या वेळी दारूची विक्री लपूनछपून केली जाते, तर काही ठिकाणी बसून दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. पण याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करतात. या ढाब्यांवर स्थानिक पोलीसही कारवाई करीत नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभाग नाममात्रभंडारा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूविरोधात कारवाई करण्यासाठी धजावत नाही. अवैध दारूविक्रेते व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका येते. या अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

नकली दारूकडे दुर्लक्ष, हातभट्टीवर कारवाईभंडारा जिल्हा पोलीस विभागाने यापुर्वी हातभट्टी दारूविक्रेत्यांवर कारवाई करून आपली स्तुती करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आजही अवैध व नकली दारू जोमाने सुरूच आहे. यापुर्वी नकली दारूकडे दुर्लक्ष करून हातभट्टी चालकांवर हजारो कारवाया केल्या.

कोरोनाच्या काळात एकाच ढाब्यावर कारवाईढाब्यावर दारू पार्ट्या करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक ढाब्यावर जिल्हा पाेलिसांच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु अलीकडे अवैध दारू विक्री जोमात सुरू असली तरी कोणत्याच ढाब्यावर कारवाई झाली नसल्याचे कळते.

नकली दारूची सर्रास विक्री?भंडारा जिल्ह्यात नकली दारूविरोधात दोन वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली. महिनाभरापूर्वी जिल्हा पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. परंतु असे अनेक नकली दारू गाळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी