शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी डीएपी खत मिळालेच नाही तर कोणता पर्याय वापराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:39 IST

Bhandara : जिल्ह्यात पाऊस लांबला; पेरण्या रखडल्या, पेरणीनंतर वाढणार खताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात एक लाख ८५ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होणार आहे; परंतु पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पेरणीनंतर पन्हे वाढीसाठी शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मागणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, डीएपी खत वेळीच उपलब्ध होत नाही. डीएपी खत मर्यादित असल्यास शेतकरी पर्यायी खतांचा वापर पेरणीवेळी किंवा पेरणीनंतर करू शकतात. यासाठी कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसएसपी खतामधून गंधक मूलद्रव्य तसेच पोटॅश मिळते. यासोबतच टीएसपी खतामधूनही गंधक मूलद्रव्य प्राप्त होत असते. याचा पिकांना फायदा होतो. अनेक शेतकरी डीएपी खताबाबत आग्रही असतात. त्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा. 

डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट)खतामध्ये १८ टक्के नत्र, तर ४६ टक्के स्फुरद ही मूलद्रव्ये आहेत. डीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खताची सर्वाधिक मागणी आहे. हे खत देशाअंतर्गत तयार होते.

हा पर्याय ठरू शकतो उत्तम; पिकांचेही भरपूर पोषण

  • डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीबरोबरच एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६ व एनपीके १५:१५:१५ या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरदबरोबरच पालाश हे मूलद्रव्यसुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.
  • टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) या खतामध्ये ४६ टक्के स्फुरद मूलद्रव्यांची मात्रा असून, डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तोदेखील डीएपी खताला उत्तम पर्याय आहे. एसएसपी खतामध्ये स्फुरद-१६ टक्क्यांसह सल्फर व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये आढळून येतात. सल्फर मूलद्रव्यामुळे तेलबिया पिकांसाठी याचा वापर फायदेशीर ठरतो.

७३९ मेट्रिक टन डीएपी शिल्लक खतसाठाजिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी ५५०० मेट्रिक टन डीएपी खताची मागणी करण्यात आली असून, ४६०० मेट्रिक टन आवंटन झाले आहे. १३ जूनपर्यंत एकूण उपलब्ध डीएपी खतसाठा १२४२ मेट्रिक टन इतका उपलब्ध असून, ५०३ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. आता ७३९ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध आहे. हंगामात खताची गरज भासणार आहे.

"शेतकऱ्यांना खरीप हंगामात डीएपी खताची कमतरता भासल्यास पर्यायी खते वापरावीत. ही खते कृषी केंद्रात उपलब्ध आहेत."- विकास सोनवाणे, जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. भंडारा

टॅग्स :Fertilizerखतेfarmingशेतीbhandara-acभंडाराFarmerशेतकरी