शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

-तर खासदारपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:24 IST

सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उद्गार खासदार नाना पटोले यांनी काढले.

ठळक मुद्देनाना पटोले : चारभट्टी येथे श्रावणमास सांगता कार्यक्रमात वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर (भंडारा) : सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उद्गार खासदार नाना पटोले यांनी काढले.लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे आयोजित श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, सध्या भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागीलवर्षी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी कर्जमाफी झाली मात्र आॅनलाईन पद्धती जाचक ठरत आहे. संकटातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज आहे. शेतकºयांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. यासाठी राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन शेतकºयांच्या मदतीला धावून येण्याची गरज आहे. सरकारच्यावतीने शेतकºयांना मदत करण्याची वेळ आहे. सत्तेत असून शेतकºयांच्या प्रश्नांविषयी बोललो तर भूमिपूत्र म्हणून हिणविणारे आता माझ्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. परंतु सत्तेत असताना आपण शेतकºयांसाठी काय केले? याचा हिशेब जनतेला द्यावा, असा पलटवार कुणाचेही नाव न घेता त्यांनी केला.यावर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकला, वनहक्काचे दावे प्रलंबित आहेत, शेतकºयांना २४ तास वीज मिळत नाही, हे प्रश्न निकाली निघत नसतील तर खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमात उपस्थित साकोलीचे आ.राजेश काशीवार यांनी शेतकºयांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकºयांना मदत मिळाली पाहिजे, असे म्हणाले.यावेळी आ.रामचंद्र अवसरे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, लाखांदूरच्या नगराध्यक्ष नीलम हुमणे, अजुर्नीच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, शेषराव गिºहेपुंजे, कमला पाउलझगडे, सविता ब्राह्मणकर, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, प्रल्हाद देशमुख, हरीश बगमारे, रमेश मेहेंदळे, विलास हुमणे, अशोक चांडक, देवेंद्र टेंभरे, रामचंद्र राऊत, पोलीस निरीक्षक मंडलवार, वडसाचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, बंटी सहजवाणी, सुभाष खिलवाणी, रज्जू पठाण, स्वामी दिनेशानंद, बालू शिंदे, मणिलाल मिश्रा, सुनील तेलनका, गिरीश पालीवाल उपस्थित होते.संचालन नगरसेवक रामचंद्र राऊत यांनी तर आभारप्रदर्शन नूतन कांबळे यांनी केले.