भंडारा : अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड बोला, गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना रविंद्र जगताप म्हणाले, लोकांना आनंद कसा देता येईल, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा अधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्थ कर्मचाºयांना कटू बोलावे लागते. त्यामागील भूमिका ही केवळ समाजाचे काम तात्काळ व्हावे ही असते. त्यामुळे कटू बोलण्यामागील भूमिका समजून घेतली आणि मनातील कटूता कायमची हद्दपार केली तर समाजात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मकरसंक्रातीच्या काळात तिळगूळ देऊन गोड बोला असे म्हटले जाते. तीळ शारीरिक वृध्दी करते. स्निग्धता वाढविते. या सणातून मनाचीही स्निग्धता वाढवावी. गोड बोलण्याने अनेकदा काम हलके होते. पंरतू त्यातून कामाप्रति निष्ठा असणे गरजेचे आहे, असे रवींद्र जगताप यांनी सांगितले. सण उत्सव साजरे करताना एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे.सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सण उत्सवांचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन घेता येतो. मकरसंक्रात हा सण तर थेट गोड बोलण्याचा सल्ला देतो. या सणापासून प्रत्येकाने काही तरी शिकले पाहिजे आणि समाजात आनंदाची पेरणी करता आली पाहिजे, असे जगताप म्हणाले.
मनातील कटुता कमी झाली तर समाजात आनंदाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:58 IST
अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.
मनातील कटुता कमी झाली तर समाजात आनंदाची निर्मिती
ठळक मुद्देसीईओ रवींद्र जगताप म्हणतात,