शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

"दुसऱ्या कुणाशी लग्न करू देणार नाही... " प्रेमाच्या नावाखाली धमकी आणि ब्लॅकमेलिंग; पवनीतील तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:23 IST

Bhandara : आईच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अन्य कुणासोबतही लग्न करू देणार नाही, समाजात बदनामी करेल, अशी धमकी माजी प्रियकाराकडून मिळाल्याने तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना पवनी येथे ३ जूनच्या सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दुसऱ्या दिवशी ४ जूनला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साक्षी तलमले (२४) असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी राजेश मोहते (२६) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 

माहितीनुसार, साक्षीचे गेल्या तीन-चार वर्षापासून शेजारी राहणाऱ्या राजेशशी प्रेमसंबंध होते. कुटूंबियांनी समजूत घातल्यावर साक्षीने त्याच्याशी बोलणे बंद केले आणि कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करण्यास तयार झाली. परंतु, आरोपी तिला धमक्या देत राहिला. 'दुसऱ्या कुणाशी लग्न करू देणार नाही. तसे झालेच तर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेल', अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे बदनामीच्या भीतीपोटी धास्तावलेल्या साक्षीने ३ जूनच्या संध्याकाळी ७:३० वाजता घरात कीटकनाशक गिळले. गंभीर अवस्थेत तिला पवनीहून भंडारा येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. ४ जूनला सकाळी ११.१५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राजेशचा मोबाइल जप्ततपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक चौकशीसाठी आणि प्रकरणाचे धोगदोरे शोधण्यासाठी राजेशचा मोबाइलदेखील जप्त करण्यात आला आहे. त्याची फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणी सुरु आहे. तरुणीची आई वंदना तलमले (४५) यांची तक्रार आणि भंडारा येथून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे भान्यास कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली.

टॅग्स :bhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी