शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारण्यासाठी रचला डाव पतीने टाकले भाजीत विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:52 IST

Bhandara : चिचोली येथील घटना; पतीविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पैशाच्या तगाद्यामुळे माहेरी निघून गेलेली पत्नी परतल्यावर तिच्या भाजीमध्ये विष टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावात घडली. सुदैवाने मुलाने हा प्रकार बघितल्याने त्याने आईला सांगितले. त्यामुळे पतीचा डाव फसला. दिव्या दिसाराम जांभूळकर (४०) असे पत्नीचे नाव असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती दिसाराम सोमा जांभूळकर (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २५ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रानुसार, दिसारामने मे महिन्यात वडिलोपार्जित अर्धा एकर शेती विकली. विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी स्वतःच्या नावे असलेल्या बँक खात्यात २ लाख रुपये तर पत्नीच्या बँक खात्यात ३ लाख रुपये जमा केले होते. दिसारामने आपल्या खात्यामधून रक्कम काढून दुचाकी खरेदी केली. लोकांकडून घेतलेले कर्ज परत केले व उर्वरित रक्कम दारू पिण्यात खर्च केल्याची पत्नीची तक्रार आहे. स्वतःच्या बँक खात्यातील पैसे संपल्यावर त्याने पत्नीच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी तगादा सुरू केला. त्यासाठी दारू पिऊन शिवीगाळ करून मारपीट सुरू केली. १२ सप्टेंबरला पत्नीला मारझोड करून घराबाहेर काढले. त्यामुळे दिव्या दोन मुली व एका मुलासह माहेरी निघून गेली. पाच दिवसांपूर्वी ती घरी परतली होती. दिसाराम दोन दिवस पत्नीसोबत चांगला राहिला; मात्र पुन्हा पैशाची मागणी सुरू केली. 

घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. मुलगा. दिव्या व दिसाराम तिघे जण घरी होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास, 'मला पैसे देत नसशील तर मी घरचे तांदूळ विकतो', असे बोलून तांदूळ उचलण्यासाठी गेला. मात्र, पत्नीने रोखल्याने त्याने तिचा हात मुरगळून शिवीगाळ केली व घराबाहेर निघून गेला. 

थोड्या वेळात घरी परतल्यावर दिव्याने त्याला जेवण वाढले. त्याच्या जेवणानंतर दिव्या अंघोळीला गेली असता दिसारामने उरलेल्या भाजीमध्ये धानावर फवारणीचे लाल रंगाचे औषध टाकले. पत्नी दिव्याच्या तक्रारीवरून दिसारामच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी भाजी ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानू रायपुरे करीत आहेत. 

असा उघडकीस आला प्रकार पत्नी अंघोळीला गेली असता दिसारामने मुलाला कोंबडा सुटला का, हे पाहायच्या बहाण्याने घराबाहेर पाठवले. मात्र, कोंबडा सुटला नसल्याने मुलगा लगेच माघारी आला असता वडील भाजीत धानावर फवारण्याचे औषध टाकत असल्याचे त्याने पाहिले. मुलगा आल्याचे पाहून दिसारामने त्याला पुन्हा खर्रा आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठविले. मात्र, मुलाने डब्यातील भाजी खाऊ नको, असे सांगून आईला सावध केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा