शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर व दुचाकीची जबर धडक, पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:02 IST

पत्नीही गंभीर जखमी : कुंभली बसस्टँंडपुढे घडली घटना

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : साकोलीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभली बस स्थानकाच्या अगदी समोरच ट्रॅक्टर व दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीपैकी पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी ८ जूनला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान घडली. 

ईटखेडा या गावाहून अमोल विश्वनाथ हटवार (२५) व पत्नी निशा अमोल हटवार दे दोघेही पती-पत्नी दुचाकीने (क्रमांक एमएच ३५, एपी ४१२०) साकोलीकडे निघाले होते. दरम्यान, कुंभलीजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागच्या चाकामध्ये आली. यामुळे अमोल हटवार यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी निशा अमोल हटवार गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली. तेथे प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथे पाठवण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३६, एल ६८४४) कुंभली येथील नीताराम भेंडारकर यांचा मालकीचा आहे. तो पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला आहे. 

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह 

अमोल हटवार याचा रामनवमीच्या दिवशी म्हणजे तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अमोल हटवार याच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. ट्रॅक्टर चालकाला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राजेश थोरात पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा