ऑनलाईन लोकमतभंडारा : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर वेळप्रसंगी हंटरमार आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरू, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.गोसे प्रकल्पग्रस्त गावच्या समस्या ऐकण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी निमगांव येथे भेट दिली, यावेळी ते बोलत होते. २१ फेब्रुवारीला मानेगाव येथे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धरणाच्या पाळीवर आंदोलन करण्यात ेयेत आहे. यानुशंगाने, ते निमगांव येथे आले असता नागरिकांना संबोधित करीत होते. यावेळी डॉ. संजय एकापुरे यांनी निमगाव गावातील ७५ टक्के शेतकºयांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या आहे.फक्त ७५ टक्के शेतकºयांचे घरच राहिलेले आहे व जीवन जगणे कठीण झाले आहे. सभोवताल गोसेचे दूषित पाणी आल्याने दुग्ध व शेती व्यवसाय बंद झालेला आहे.या पाण्यामुळे जनावरांचे हाल होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असल्याचे सांगितले. त्यामुळे प्राणी अत्याचार गुन्हा गोसेच्या अधिकाऱ्यांवर दाखल करावा, असे सांगितले. ग्रामपंचायतच्या वतीने आमदार कडू यांना निवेदन देऊन गावाचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे, असे सरपंच शंकर मडावी यांनी सांगितले. निमगाव येथील डॉ. शहारे यांनी नाग नदीचे पाणी गोसे धरणात आल्याने फार मोठी जीवीतहानी होणार असल्याने यावर मार्ग काढावा असे सांगितले. तसेच संपूर्ण निमगाव, पागोरा ग्रामवासी २१ तारखेला गोसेला आपण सोबत राहून आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे ग्रामवासीयांनी सांगितले.यावेळी सरपंच शंकर मडावी, अंबादास चवळे, डॉ.वसंता शहारे, परमानंद धुडसे, कवडू गाढवे, क्रिष्णा चवळे तसेच शेकडो ग्रामवासी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांसाठी ‘हंटरमार’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:22 IST
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर वेळप्रसंगी हंटरमार आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरू, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.
प्रकल्पग्रस्तांसाठी ‘हंटरमार’ आंदोलन
ठळक मुद्देबच्चू कडू : निमगाव येथे प्रकल्पग्रस्तांना केले मार्गदर्शन, ग्रामवासी होणार सहभागी