शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

भंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:54 PM

न्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत

ठळक मुद्देवनविभागाकडून दुर्लक्षउपोषणात लहान मुलांचाही समावेश

आॅनलाईन लोकमतभंडारा : न्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणात वनमजुरांची लहान मुलेही सहभागी आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असला तरी उपोषणाची वनविभागाने दखल घेतलेली नाही.उपोषणकर्ते हे वनमजूर म्हणून वनविभागात कार्यरत होते. सन २०११ मध्ये या २१ वनमजुरांना वनविभागाने कायमचे बंद केले होते. त्यांच्या ठिकाणी इतर ३० ते ३५ वनमजूर कामावर ठेवण्यात आले. ते वनमजूर आजही कामावर आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त वनमजुरांनी भंडारा कामगार न्यायालयात दाद मागितली होती. कामगार न्यायालयाने ३० आॅगस्ट २०१७ रोजी या २१ वनकामगारांना पूर्ववत रूजू करण्याचे व थकीत वेतन देण्यात यावे, असा आदेश दिला. या आदेशान्वये वनाधिकाऱ्यांना आदेशाची प्रत देऊन स्वतंत्र अर्ज सादर केला. मात्र अजूनपर्यंत या कामावर घेण्यात आले नाही. परिणामी वनमजुरांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान एखाद्या वनमजुराने आत्महत्या केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वनविभागाची राहील, असेही निवेदनात नमूद आहे. या उपोषणात वनमजुरांचे कुटुुंबिय सहभागी असून लहान-लहान मुलांचा यात समावेश आहे. या आंदोलनात प्रकाश वैद्य, कृष्णा गौतम, रेकचंद राणे, चंद्रशेखर पटले, माणिकराव चौधरी, उमेद रहांगडाले, टेकचंद राणे, नूतनलाल गौतम, कामेश्वर पारधी, शामलाल कांबळे, चंद्रभान गौतम, ब्रिजलाल ठवरे, गणेश भगत, राजेश पंधरे, शामसुंदर रामटेके, गणेश शहारे, तेजराम कुंभरे, संतोष मेश्राम व महादेव कटरे या वनमजुरांचा त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग