शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

कार्यक्रमाअभावी ग्रामीण कलावंताची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : अनेक कलाकारांच्या कुटुंबाचा जगण्यासाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामस्तरीय कलेचे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी तहसीलदारांना राष्टीय अमर कला निकेतनच्या वतीने निवेदन देण्यात आले. कलावंताच्या मागणीसाठी अमर कला निकेतन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मोहाडी येथे बैठक घेण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे हिरालाल नंदनवार, शहादत अली सैय्यद, शेखर खडसे, प्रभाकर तेलंग,दिनेश गोविंद खडसे, यशवंत थोटे मोहाडी, राजहंस देवगडे शिवानी सुखदेवे, वैशाली रहांगडाले, माधुरी पाटील उपस्थित होते. बैठकीत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात शाहीर मंडळीनी आपले मनोगत व्यक्त केले.देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.खडी गमतीच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा वसा घेतलेले कलावंत आज हवालदील झालेला आहे. तरीही ताठ मानेने, स्वाभिमानाने तो समाजात जीवन जगत आहे. अशा कलावंताना आत्मनिर्भरतेसाठी शासकीय स्तरावर आर्थिक सहकार्य केले गेले तर कलावंत खंबीरपणे जगु शकतो व समाज प्रबोधन करू शकतो. खडी गंमत कार्यक्रमाची सुरुवात गणपती उत्सवापासून सुरू होत असते. त्यामुळे शासनाने या रंगभूमीचा आणि कलावंतांचा विचार करावा, अशी मागणी झाडीपट्टी रंगाभूमीतील नाट्य कलावंतांनी शासनाकडे केली आहे.देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कलावंताचा सिंहाचा वाटा आहे. शासनाने विविध शासकीय योजनेतून कलावंताच्या पाठीशी उभे असणे अत्यावश्क आहे. सास्कृतिक कार्यक्रम करण्याकरीता परवानगी देण्यात यावी.सांस्कृतिक वारसा जीवंत ठेवण्यासाठी शासनाने कलावंताच्या प्रश्नाकडे गांभीयाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदिवे यांच्या पुढाकारात अंबादास नागदेवे, आर्यन नागदेवे, वैशाली रहांगडाले गराडा, माधुरी पाटील, शेखर खडसे, सुनिल खडसे, सुभाष टेकाम, यांनी मोहाडी तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी गणेश संतापे, यादवराव तुमसरे, सेवकराम खडसे, विजय गिरेपुंजे, ढेकल मेश्राम, विकास रतनपुरे, विघ्नेश्वर बावणे, रवींद्र भोयर, इसुलाल वाघाडे, राहुल मोथरकर, राजकुमार गजभिये, विकास वाघमारे, राजू कानसकर, रामकृष्णा ताडेकर, विश्वनाथ गिरडकर, रमेश बांते, मुकेश देशमुख, गोखल मने, जगदीश देव्हारे, शिवलाल राऊत, अरविंद बन्सोड, उमेश सोमेश्वर मेश्राम, विशाल शिंदे, किशोर शिंदे, देवचंद गोमासे, ज्ञानेश्वर भोयर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार