शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी बंदमुळे शेकडो धानपोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला. शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान पोहोचता केला.

ठळक मुद्देवाहनी केंद्रातील प्रकार : शेतकऱ्यांवर सुल्तानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो पोती धान पडून आहे. परंतु धान खरेदी केंद्र सुरू करण्याला अजुनपर्यंत परवानगी मिळाली नाही. एकीकडे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असताना आता सुल्तानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला.शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो क्विंटल धान पोहोचता केला. खरेदी केंद्राच्या सभोवताल धानाची पोती सध्या ठेवली आहेत. मागील आठ दिवसापासून सदर शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडून आहे.पावसात धान भिजू नये म्हणून शेतकऱ्यांनी धान पोत्यावर प्लॉस्टिक झाकून ठेवले आहे. धानाच्या पोत्यांवर उंदरांनी ताव मारणे सुरू केले आहे. त्यामुळे धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. धान चोरीची शक्यता येते नाकारता येत नाही. एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळाशी सामना करित आहे तर दुसरीकडे कसेबसे धान वाचवून विक्रीकरीता आणले तरी त्याची खरेदी करायला कुणी वाली दिसत नाही, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या.जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे दुर्लक्षशासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी परवानगी देतात. शासनाचे आदेश जिल्हा मार्गेटिंग अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. परंतु तांत्रिक अडचण कुठे आली हे समजायला मार्ग नाही. नवनिर्वाचित आमदार तथा खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांत प्रचंड रोष दिसत आहे.वाहनी येथील धान खरेदी केंद्रावर शेकडो पोती धान पडून आहे, परंतु मागील आठ दिवसापासून धान खरेदी केंद्र बंद आहे. धानाचे मोठे नुकसान येथे होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड