शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
2
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
3
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
4
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
5
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
6
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
7
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
8
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
9
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
10
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
11
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
12
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
13
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
14
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
15
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
16
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
17
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
18
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
19
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
20
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न

शेकडो पोती धान उघड्यावर

By admin | Updated: December 21, 2015 00:36 IST

सुरु असलेला आधारभूत धान खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेले हजारो पोती धान उघड्यावर व बेवारस स्थितीत पडून आहे.

धान बनले गुरांचा चारा : आॅर्डर मिळाल्याने आधारभूत केंद्र बंदचराहुल भुतांगे तुमसरसुरु असलेला आधारभूत धान खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेले हजारो पोती धान उघड्यावर व बेवारस स्थितीत पडून आहे. परिणामी केंद्रावरून धानाच्या पोती चोरीला जाण्याबरोबरच पोत्यातील धान गुरांचा चारा बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.तुमसर शहर व परिसरातील दहा ते बारा गावातील शेतकऱ्यांकरिता जयपुरिया भवन तुमसर येथे पार्वता बहु. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित तुमसर या संस्थेला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र देण्यात आले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर धान खरेदी केंद्र देण्यात आले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर धान खरेदी सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीकरिता केंद्रावर आणले व आणखीही आणणे सुरुच असताना अचानकच दहा दिवसाअगोदर कुणालाही काही कळण्याच्या आधी आधारभूत केंद्र संचालकामार्फत बंद करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांचे धान विक्रीकरिता केंदयावर आणणे सुरुच होते. केंद्र संचालकाने धान विक्रीला आणू नये किंवा कसे काय याबाबत सूचनाही लावल्या नव्हत्या. त्यामुळे केंद्राचा पटांगण धानाच्या पोत्यांनी भरला. धान केंद्रावर असल्याने आपला माल सुरक्षितच राहतो या अपेक्षेने शेतकरी चिंतामुक्त होता व रोज एक फेरी धान खरेदी केंद्रावर मारून केंद्र सुरु झाले किंवा नाही याची खातरजमा करीत होता. मागील दहा दिवसापासून केंद्रावर किंवा त्या आवारात केंद्र संचालकांचा कोणताही इसम त्यांना दिसत नव्हता. आपला धान आज ना उद्या विकल्या जाईल या आशेने वाट बघत असलेल्या शेतकऱ्याची मात्र पुरती निराशाच झाली. कारण बेवारस स्थितीत पडलेल्या धानाच्या पोत्यांचा कोणीही वाली नसल्याने रात्री अपरात्री धानाच्या पोती चोरीला गेल्याची तक्रार द्वार्वेकर नामक शेतकऱ्याने केली तर डोंगरला येथील पटले नामक शेतकऱ्याने १५० धानाच्या पोती आधारभूत केंद्रावर आणले होते. त्या केंद्राला कुंपण नसल्याने गुरे ढोरे नी आपला बसतात केंद्रावर मांडून अक्षरश: धानाची पोती फोडून ते खात असल्याने ५ ते १० पोती धान त्या शेतकऱ्याचे कमी झाले. केंद्रावर जर केंद्र संचालकाने सुरक्षा व्यवस्था ठेवली असती तर कदाचित हे अनर्थ टळले असते व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लावला नसता एवढे निश्चित.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने करारनामा न झाल्याने (डी.ओ.) डिलेव्हरी आॅर्डर दिले नव्हते व गोदामाचीही क्षमता संपुष्टात आल्याने केंद्र मधात बंद ठेवावे लागले. परंतु डिलेव्हरी आॅर्डर मिळाल्याने लवकरच आधारभूत धान खरेदी केंद्र सुरळीत सुरु होईल.- राजू गायधनेकेंद्र संचालक, आधारभूत केंद्र, तुमसर.