शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

खाकी वर्दीने जोपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात भोजनाची व्यवस्था तर केलीच मात्र त्या मजुरांना मध्यप्रदेश सीमेत वाहणाने नेऊन सोडले. देव्हाडा येथील रेल्वे कंत्राटदाराकडे छिंदवाडा येथील सात मजूर कामासाठी होते.

ठळक मुद्देछिंदवाड्याच्या २२ मजूरांना दिले भोजन : मजुरांनी मानले पोलिसांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्यातील सर्व कंत्राटदाराने आपली कामे बंद केली. याचा फटका तुमसर येथील रेल्वे कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या छिंदवाडा येथील २२ मजूरांना बसला. जिल्हाबाहेरील मजुरांना आपल्या मुळगावी परतण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. गावाकडे जावे म्हटले तरी पोलिसांची भीती. इथेच रहावे म्हटले तर जवळील राशन संपले. मजूरी नाही, दिवसामागून दिवस जात असल्याने अखेर गुरुवारी रात्री छिंदवाडा येथील मजूरांनी आपल्या मुळगावी जाण्याचा निर्णय घेतला. देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात भोजनाची व्यवस्था तर केलीच मात्र त्या मजुरांना मध्यप्रदेश सीमेत वाहणाने नेऊन सोडले. देव्हाडा येथील रेल्वे कंत्राटदाराकडे छिंदवाडा येथील सात मजूर कामासाठी होते. जिल्ह्यात २५ मार्च रोजी लॉक डाऊन झाल्यानंतर काम बंद झाले. मजुरांनी दोन दिवस काम सुरु होण्याची प्रतीक्षा केली. मात्र आता काम सुरु होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जवळील सर्व खाण्यापिण्याचे सामान संपल्याने अखेर गावाकडे निघून जाण्याचा निर्णय घेतला. अशा भयभीत मनस्थितीत असलेले मजूर स्थानिक रहिवासी राजेश कुंभारे यांना दिसले. त्यांची विचारपूस करताच त्यांनी आपली आपबिती सांगितली. पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ देव्हाडी उड्डाणपूला जवळ भेट दिली.येथे मजुरांशी चर्चा करुन त्यांना मध्यप्रदेशात सोडण्याचे आश्वासन दिले. आणि ते पुर्णही केले.मध्यप्रदेश सीमेत सुखरुप पोहचविलेछिंदवाडा येथील कामगार गुरुवारी रात्री तुमसर पोलिसांना गस्ती दरम्यान आढळले. यावेळी पोलिसांनी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करुन त्यांना सुखरुप मध्यप्रदेशातील सीमेत सोडण्यात आले. यावेळी कंत्राटदाराला संपर्क केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र पोलिसांनी शोध घेऊन सदर कंत्राटदाराला नक्कीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांनी दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस