शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

मानव मिशनची बस येते सकाळी, शाळा भरते दुपारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात.

ठळक मुद्देमुलींची गैरसोय : शाळा सकाळ सत्रात सुरू करण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मानव विकासअंतर्गत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस सकाळी धावू लागल्या आहेत. तथापि, काही शाळा दुपार सत्रात भरतात. त्यामुळे मुलींना दुपारच्या शाळेत लांब अंतरावरून पायपीट करीत शाळेत यावे लागत आहे. तथापि सर्व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात सुरू करण्यात यावा, अशी मागणी मोहाडी मुख्याध्यापक संघाने केली आहे.मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात. मार्च महिन्यापासून तुमसर बस स्थानकवरून मानव विकास योजनेच्या बसेस मुलींना शाळेत आणण्यासाठी सकाळी येत आहेत.मोहाडी तालुक्यात दहावीचे परीक्षा केंद्र असणाऱ्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरत आहेत. त्यामुळे काही मुख्याध्यापकांनी तुमसर आगार प्रमुखांना सकाळ सत्रात बस सुरू करण्याची मागणी केली. त्या विनंतीनुसार सकाळ सत्रात बसेस येत आहेत. काही ज्या शाळेत परीक्षा केंद्र नाहीत अशा बहुतेक शाळा दुपार सत्रातत भरत आहेत. त्यामुळे मुलींना शाळेत येण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. मानव विकास योजनेच्या बसेस सकाळी सुरू करण्यात आल्या याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. मानव विकास बसच्या दळणवळणबाबत शिक्षण विभाग व तुमसर आगार प्रमुख संवादाचा अंतर पडल्याने काही शाळेतील मुलींच्या शाळेत येण्याजाण्या प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. प्रत्येक शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, सहायक केंद्रसंचालक, सहायक परीरक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करण्यासाठी दहावीच्या पेपरच्या दिवशी शिक्षक जात आहेत. तसेच मार्च महिन्यात वेगवेगळे प्रशिक्षण होत आहेत. याचा प्रभाव शाळांवर पडला आहे. या समस्येविषयी शिक्षण विभागाला कल्पना आहे. असे प्रश्न निर्माण झाले अनेक शाळा सकाळ की दुपारच्या सत्रात सुरू ठेवायच्या या कोंढीत सापडले आहेत. तरी सर्व माध्यमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कडे केली आहे. गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांचे मार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांना मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गोपाल बुरडे, सचिव राजू बांते, राजू भोयर, सहसराम गाडेकर, अतुल बारई, सिंधू गहाने, कमल कटारे, सुनीता तोडकर, दिगंबर राठोड, यशोदा येळने, विनोद नागदेवे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी