किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:19+5:302021-07-30T04:37:19+5:30

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री ...

How much loot? Onion in BTB market is Rs. 20, while near home it is Rs. 35 per kg | किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

Next

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री करीत आहेत. मात्र शहरात होलसेल दरात मिळणारे दर व बाहेर रिटेलमध्ये असलेल्या दराची तुलना केली तर भाजीपाल्याचे दर हे दुप्पट दराने विक्री केली जात आहे. भंडारा शहरातील बीटीबी सब्जीमंडीत कांदा २० रुपये किलो असला तरी घराजवळ मात्र तो ३० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी आधुनिक युगात हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटली आहे. परिणामी व्यापारी स्वस्त दरात भाजीपाल्याची खरेदी करीत असला तरी ग्राहकांना तो महाग घ्यावा लागतो.

बॉक्स

गांधी चौकात भेंडी, १० रुपये, त्रिमुर्ती चौकात, १५ रुपये किलो

शहरात होलसेल भाजीपाला विक्रीचे ठिकाण बीटीबी सब्जीमंडी आहे. याठिकाणी भेंडीचे दर पाच ते सात रुपये किलो होते. मात्र याच भेंडीची शहरातील गांधी चौकात खरेदी केली असता ते दहा रुपये तर त्रिमुर्ती चौकात १५ रुपये किलो होती.

बॉक्स

पिकवितात शेतकरी जास्तीचा पैसा तिसऱ्यांच्याच हातात !

जिल्ह्यात भाजीपाल्याची आधुनिक शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मात्र भाजीपाल्याला अत्यल्प दर मिळत असल्याने संकट उभे ठाकले आहे. मजुरीचे दर, कीटकनाशक, खत यांचे नियोजन आवाक्याबाहेर आहेत. अशा स्थितीत शेतकरी आपला माल सब्जीमंडीत विकूण आपली उपजिवीका भागवित आहे. खर्च झालेला उत्पन्न भाजीपाला विक्रीनंतर मिळत नाही. व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीनंतर तोच माल दुकानदारांना विकला जातो. दुकानदार रोजगारासाठी पाच ते दहा रुपये अधिकची रक्कम ठेवून विक्री करतात.

कोट

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने दर अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला दर बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात दर वाढण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी भाजीपाला थेट बीटीबी सब्जीमंडीत आणतात. वाहतुकीवर खर्च, भाजीपाला पिकविताना मजुरीचे दर, कीटकनाशक, रासायनिक खत यासह पिकांची देखभाल शेतकरी करीत असतो. त्यानंतर रोजगार म्हणून दुकानदार सब्जी मंडीतून भाजीपाला खरेदी करून विकत असतात. त्यामुळे फायद्याच्यादृष्टीने दरवाढ होत असते.

- बंडू बारापात्रे.

कोट

होलसेल बाजारातून भाजीपाला स्वस्त असला तरी वाहतूक खर्च पाहता होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळच्या दुकानातून भाजीपाला खरेदी करतो.

- नंदा सार्वे.

कोट

समारंभांमध्ये नातेवाईक अधिक असतात. त्यामुळे होलसेल बाजारातून खरेदी परवडते. मात्र घरातील दोन कुटुंबासाठी होलसेल बाजारात जावून नाहक खर्च करणे बरे नव्हे.

- शिला साखरे

Web Title: How much loot? Onion in BTB market is Rs. 20, while near home it is Rs. 35 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.