शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या शेंगा, पोखरणाऱ्या अळीला कसे रोखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:47 IST

थंड हवामान पोषक अन् घातक : योग्य व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामात लागवड झालेले तुरीचे पीक फुलोऱ्यावर आहे. काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवातही झालेली आहे; पण याच आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्यापासून पारा ९ अंशापर्यंत उतरला.

त्यामुळे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक ठरत आहे. तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून अळीला रोखावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यांमधून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि. मी. लांब, विविध रंग छटेत दिसून येतात. 

यामध्ये पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाच्या अळ्या असून, तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांतील दाणे पोखरून खातात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत असते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस तसेच कीड व रोगामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही अळीमुळे धोका संभवत आहे. 

शेंगा पोखरणाऱ्या अळी आक्रमण अळी लहान असताना पानांवर, तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या, फुले आणि शेंगांवर आक्रमण करते. अळी शेंगांवर विविध आकाराचे छिद्र पाडते. फुले आणि कोवळ्या शेंगांना आतून खाल्ल्याने नुकसान होते आणि फुलेही गळतात.

कीटकनाशके फवारूनही उपयोग होईना शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे तूर पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

अळीला कसे रोखाल? पहिल्या फवारणीत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझेंडेंरेक्टीन ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव असेल तर १५०० पीपीएम अझेंडरेक्टीन २५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

जिल्ह्यात ११,४०० हेक्टर्सवर तूरजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुऱ्यांवर तसेच सलग व सोयाबीन पिकात तुरीची लागवड करण्यात येते. ■ यावर्षी ११ हजार ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा