शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

तीन एकरातून फुलविली बागायती शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीही वाढली.

ठळक मुद्देअन्य शेतकऱ्यांना दाखविला आर्थिक उन्नतीचा मार्ग, प्रगतशील शेतकºयाच्या मेहनतीला लाभले यश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : योग्य नियोजन व मेहनतीच्या भरवशावर एका तरुणतुर्क शेतकºयाने अवघ्या तीन एकरात बागायती शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांनाही याद्वारे आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील स्वप्नील शंकरराव नंदनवार असे या प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव आहे.स्वप्नीलने त्याच्या वडीलोपार्जीत शेतात सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत बागायती शेतीची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. बागायत शेतीतून निघणाºया हिरव्या भाजीपाल्याला पालांदूर परिसरातील १५ किलोमीटर पर्यंतच्या गावातील नागरिकांची मागणी असल्याचे दिसून येते. आधुनिक शेतीतून आर्थिक उलाढाल कशी करता येईल याचे उत्तम उदाहरणही स्वप्नीलने दिले आहे. अल्प जागेतून उत्तम उत्पादन कसे घेता येईल हे पटवून देण्यासाठी त्याने बागायती शेतीचा संकल्प सोडला.कारले, भेंडी, काकडी, पालक, कांदे, चवळी, वांगी, भोपळा या पिकांना मोठी मागणीही मिळाली.संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीही वाढली.थेट ग्राहकांना विक्रीसुरुवातीला तीन एकर शेतात बागायती शेती करण्यास सुरुवात केली. आंतरपीक निघण्यास प्रारंभही झाला. त्याची फलश्रूती आता दिसू लागली आहे. शेतातून काढलेले पीक दलाल अथवा व्यापाºयांच्या हातात दिले तर तुटपुंज्या पैशावर समाधान मानावे लागते. त्यामुळे स्वप्नीलने मध्यस्थापर्यंत आपला भाजीपाला न देता थेट ग्राहकांनाही विकण्यास सुरुवात केली.

टॅग्स :agricultureशेती